युवा आमदार रोहित पवार खुळखुळ्याची काठी घेऊन थिरकतात तेव्हा; VIDEO होतोय व्हायरल!

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 31 December 2020

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या युवा आमदार रोहित पवारांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्यही केले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. खुळखुळ्याची काठी घेऊन आदिवासी बांधवांबरोबर केलेले नृत्य सध्या सगळ्यांनाच भावतयं...

नाशिक : सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या युवा आमदार रोहित पवारांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्यही केले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. खुळखुळ्याची काठी घेऊन आदिवासी बांधवांबरोबर केलेले नृत्य सध्या सगळ्यांनाच भावतयं...

आदिवासी बांधवांसोबत नृत्य चांगलचं होतयं व्हायरल...
 युथ आयकॉन म्हणून ओळखले जाणारे कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी रविवारी (ता.२७) रात्री कळवण तालुक्यातील डोंगऱ्यादेव उत्सवात सहभाग नोंदवला. नाशिकहून आमदार पवार रविवारी (ता.२७) नाशिकच्या दौऱ्यावर असताना कॉलेजरोड परिसरातील 'चाय टपरी' येथे त्यांनी युवकांशी संवाद साधला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आयोजित या कार्यक्रमात 'महिला सुरक्षा, बेरोजगारी, नोकर भरती, आयटी पार्क, राजकारणातील नेतृत्व' या विषयावर युवकांनी पवारांना प्रश्न विचारले. त्यानंतर नाशिकचे सर्वच कार्यक्रम आटोपत रविवारी रात्री पवार गडावर दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी नांदुरी येथे डोंगऱ्यादेव उत्सवात भेट दिली. या उत्सवात आदिवासी बांधवांबरोबर खुळखुळ्याची काठी घेऊन नृत्यही केले. यावेळी पवार यांच्यासमवेत आमदार नितिन पवारदेखील थिरकले.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

ग्रामस्थांसोबत धरला फेर धरून ताल

पिंपळा येथून मोहबारी येथील जागरण उत्सवात ग्रामस्थांसमवेत घुंगराची काठी घेऊन फेर धरून ताल धरला. ग्रामस्थांकडून उत्सवाची सविस्तर माहिती करून घेतली. रात्री एकला नाशिककडे प्रयाण केले. आदिवासी बांधवांची कला, संस्कृती व आदरातिथ्य बघून आमदार रोहित पवार भारावले. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, जयश्री पवार, हिरामण खोसकर, धनंजय पवार, उदय जाधव, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक जगताप, राजेंद्र भामरे, राम चौरे, राजू पाटील, सुधाकर सोनवणे, डी. एम. गायकवाड, कैलास बहिरम आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla rohit pawar dance viral nashik marathi news