मनसेत इनकमिंगची वारी! नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा कृष्णकुंजवर पक्षप्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु करण्यात आली आहे.  नाशिकमध्ये सुद्धा निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांची ताकद वाढताना दिसत आहे.

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून मोठी तयारी सुरु करण्यात आली आहे.  नाशिकमध्ये सुद्धा निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांची ताकद वाढताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत इतर पक्षाच्या नेत्यांची जोरदार इनकमिंग सुरु आहे. 

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा कृष्णकुंजवर पक्षप्रवेश

गुरुवारी (ता.११) नाशिकमधील मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात काही शिक्षकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. तर नाशिकमधील शिक्षक समुदाय आणि मराठा मावळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याचे समजते. ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील गुरूवारी मनसेमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

मनसेचे नगरसेवक निवडून आणू

नाशिकमध्ये सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. नाशिकमधील शिक्षकांच्या एका समुदायाने मनसेत प्रवेश केला. आधी हे शिक्षक भाजपासाठी कार्यरत होते. तसेच, येवल्याच्या मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारीही (ता.११) मनसेत दाखल झाले. दरम्यान, आगामी काळात नाशिक महानगरपालिकेत जास्तीत जास्त मनसेचे नगरसेवक निवडून आणू,असा विश्वास अशोक मुर्तडक यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns activists join party at Krishnakunj nashik marathi news