...यासाठी मनसेचे संघटनात्मक पातळीवर बदल सुरू!

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 4 March 2020

राज्यात शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची जागा घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मनसेने संघटनात्मक पातळीवर बदल करणे सुरू केले आहेत.एके काळी बालेकिल्ला बनलेल्या मनसेला 2017 नंतर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरघर लागली. निवडणुकांच्या पातळीवर एकामागून एक पराभव पचविताना पक्षाच्या उभारणीत महत्त्वाचा सहभाग असलेल्या नेत्यांनीदेखील मनसेला सोडचिठ्ठी देत वेगळी वाट धरल्याने पक्षाला मरगळ प्राप्त झाली

नाशिक : राज्यात शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापन केल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची जागा घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मनसेने संघटनात्मक पातळीवर बदल करणे सुरू केले असून, त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतून मनसेत दाखल झालेल्या दिलीप दातीर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

2017 नंतर नाशिकमध्ये मनसेला घरघर
एके काळी बालेकिल्ला बनलेल्या मनसेला 2017 नंतर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरघर लागली. निवडणुकांच्या पातळीवर एकामागून एक पराभव पचविताना पक्षाच्या उभारणीत महत्त्वाचा सहभाग असलेल्या नेत्यांनीदेखील मनसेला सोडचिठ्ठी देत वेगळी वाट धरल्याने पक्षाला मरगळ प्राप्त झाली आहे. पक्षात नवीन माणसे येण्यास तयार नाहीत व आहेत ती जुनी माणसे पक्ष सोडून जाऊ लागल्याने मनसे अस्तित्वहीन झाली; परंतु राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर भाजपकडून मनसेला अप्रत्यक्ष बळ मिळू लागल्याने पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबरच कार्यकर्त्यांनीदेखील मरगळ झटकण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

प्रदेश उपाध्यक्षपदी इचम; जिल्हाध्यपदी दिलीप दातीर 

पक्षाला चांगले दिवस येतील या अपेक्षेने संघटनात्मक पातळीवर बदल केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिलीप दातीर यांना संघटनेचे पद देण्यात आले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष ऍड. रतनकुमार इचम यांना प्रदेश पातळीवर उपाध्यक्षपदावर बढती देण्यात आली असून, अनंता सूर्यवंशी यांच्याकडे सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, बागलाण या आठ तालुक्‍यांचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. 

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS started plan to change at organizational level Nashik Marathi political News