esakal | थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...
sakal

बोलून बातमी शोधा

baby 1.jpg

लखमापूर शिवारातील इनाम भागात शिवाजी बाबुराव देशमुख यांचे शेतात विहिरीचे खोदकाम चालू होते. त्या खोदकामासाठी राजस्थान येथील कामगार कामाला होते. ते कामगार परिवारासहित तिथेच झोपडीत तात्पुरती वस्ती करून राहत होते. (ता.२७) वेळ सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान विहिरीवर खोदकाम चालू होते मशीनचा मोठा आवाज येत होता. त्याच वेळेस झोपडीत श्रावण धनराज बिल हा सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाची निरमा धनराज बिल लहान मुलगी बसलेली होती. त्या मुलांची आई मंजु बिल हया झोपडी बाहेर स्वयंपाक करीत होती. कुठूनतरी अचानक तो तिथे आला...अन्..

थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक/ लखमापूर : लखमापूर येथे मातेने दोन लहानग्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून वाचवत आई खरोखरच मायेचा सागर असल्याचीच प्रचिती या घटनेतून आल्यावाचून राहत नाही. या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

असा घडला थरारक प्रकार...

लखमापूर शिवारातील इनाम भागात शिवाजी बाबुराव देशमुख यांचे शेतात विहिरीचे खोदकाम चालू होते. त्या खोदकामासाठी राजस्थान येथील कामगार कामाला होते. ते कामगार परिवारासहित तिथेच झोपडीत तात्पुरती वस्ती करून राहत होते. (ता.२७) वेळ सायंकाळी साडेसात वाजे दरम्यान विहिरीवर खोदकाम चालू होते मशीनचा मोठा आवाज येत होता. त्याच वेळेस झोपडीत श्रावण धनराज बिल हा सहा वर्षाचा मुलगा व चार वर्षाची निरमा धनराज बिल लहान मुलगी बसलेली होती. त्या मुलांची आई मंजु बिल हया झोपडी बाहेर स्वयंपाक करीत होती. कुठूनतरी अचानक तिथे बिबट्या आला. तिथे स्वयंपाक करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून त्या लहान मुलांच्या दिशेने झोपडी जवळ जाऊ लागला. प्लॅस्टिकने बनविलेल्या झोपडीवर पंजा मारून प्लास्टिक फाडले व झोपडीत प्रवेश करणार तोच त्या मातेचे अचानक मुलांकडे लक्ष गेले. साक्षात समोर बिबट्याच्या रुपात मृत्यू उभा असताना त्या मातेने जीवाची पर्वा न करता आपल्या लहान मुलांच्या दिशेने झोपडीकडे धाव घेतली व मोठ्याने आरडाओरड केली. विहिरीचे काम ज्या ठिकाणी सुरू होते तेथे मुलांना घेऊन पळाली.तेथील मजूर कामगारांनी झोपडीकडे धाव घेतली. त्यांनी बिबट्याला हाकलून लावले. त्यांना बिबट्या तेथून दूर जाताना दिसला. जर त्या मातेचे लक्ष झोपडी कडे गेले नसते तर किती मोठा अनर्थ घडला असता याची कल्पना न केलेली बरी.

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

बिबट्याने शेतकरी धास्तावले..

लखमापूर शिवारात बिबट्याचे हल्ले झाले. त्या हल्ल्यात शक्यतो लहान मुलेच बिबट्याने भक्ष बनविले आहे.हा शिवार नदीकाठी असल्याने हया भागात बिबट्याचे वास्तव्य कायम असल्याने शेतकरी वर्ग खूप धास्तावला आहे.लखमापूर परिसरात असा एक पण दिवस उजडत नाही की बिबट्याचे दर्शन कोणाला झाले नाही.आज शिवारात असी परिस्थिती गंभीर झाली आहे की कुत्रे थोडे बिबटे जास्त झाले आहेत. आता पर्यंत इतके बिबट्याने हल्ले केले. वनविभागास बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाहिजे तसे यश आले नाही. तरी वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे., 

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!

go to top