VIDEO : अन्यथा 'मनसे'ला खळ्ळ खट्याक करावं लागेल; वाचा कोण म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

पीएम केअर फंडातून महापालिकेला प्राप्त झालेले १५ व्हेंटिलेटर्स नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात धूळखात पडून आहेत. जर व्हेटिंलेटर उपलब्ध आहे, तर रुग्णांना व्हेटिंलेटर अभावी जीव का गमवावा लागतोय? असा प्रश्न उपस्थित करत रविवारी (ता. 6) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेच्या बिटको रुग्णालयासमोर निदर्शने केली.  

नाशिक : जिल्ह्यात वाढ चाललेली कोरोना रुग्णसंख्या बघता परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे तर स्पष्ट आहे. मात्र सुविधांअभावी कोरोनाबळींचा आकडा वाढत असतानाच पीएम केअर फंडातून महापालिकेला प्राप्त झालेले १५ व्हेंटिलेटर्स नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात धूळखात पडून आहेत. जर व्हेटिंलेटर उपलब्ध आहे, तर रुग्णांना व्हेटिंलेटर अभावी जीव का गमवावा लागतोय? असा प्रश्न उपस्थित करत रविवारी (ता. 6) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेच्या बिटको रुग्णालयासमोर निदर्शने केली.  

 'मनसे'चे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले...

व्हेंटिलेटरच्या अभावी कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. नाशिक शहरात पाचशे ते सव्वापाचशे रुग्णांना व्हेंटिलेटर अभावी आपला जीव गमवावा लागला. पीएम केअर फंडातून महापालिकेला प्राप्त झालेले सतरा व्हेंटिलेटर्सपैकी दोन खाजगी रुग्णालयांना देण्यात आले तर बाकी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात धूळखात पडून आहेत. व्हेटिंलेटर असूनही त्याचा वापर केला जात नाही. नाशिककरांचे जीव घेणे आता तरी थांबवा, अन्यथा पुढचे आंदोलन 'मनसे' स्टाईल खळ्ळ खट्याक स्वरुपाचे होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

यावेळी डॉक्‍टरांना निवेदन देण्यात आले. येथील वैद्यकीय सुविधा तसेच उपचार, सुविधांबाबत तातडीने सुधारणा करण्यात यावी. अन्यथा याविरोधात "मनसे' स्टाईल अतिशय गंभीर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांसह बंटी कोरडे, विक्रम कदम, बाजीराव मते, किशोर जाचक. श्‍याम गोहाड, संतोष पिल्ले, शशिकांत चौधरी, भाऊसाहेब ठाकरे, प्रशांत बारगळ, सुनिल गायधनी, संदेश सानप आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS warns NMC, stop taking lives of patients nashik marathi news