घंटागाडी थांबली..अन् कामगाराने महिलेचा पकडला हात..एके दिवशी अडकलाच जाळ्यात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

घंटागाडी घरापाशी यायची..महिला कचरा फेकण्यासाठी आली की घंटागाडी कामगार तिला बघायचा..तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा..एकदा तर पाठलागही केला..पण एके दिवशी अडकलाच जाळ्यात..

नाशिक : घंटागाडी घरापाशी यायची..महिला कचरा फेकण्यासाठी आली की घंटागाडी कामगार तिला बघायचा..तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा..एकदा तर पाठलागही केला..पण एके दिवशी अडकलाच जाळ्यात..

काय घडले नेमके?

अक्षय नरवणकर असे संशयित घंटागाडी कामगाराचे नाव आहे. पीडित महिलेनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पीडित महिला घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी गेली असता संशयित अक्षय याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत वेळोवेळी तिचा पाठलागही केला. रविवारी (दि.२८) सकाळी पीडित महिला नेहमीप्रमाणे घंटागाडीत कचरा टाकण्यासाठी आली असता संशयित अक्षय याने तिचा हात पकडून धमकी देत विनयभंग केल्याचे फिर्यादीत पीडितेने म्हटले आहे.

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

विनयभंगाचा गुन्हा दाखल

सातपूर पोलीस ठाणे हद्दीत धर्माजी कॉलनी भागात घंटागाडी कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: molestation with woman by cleaning worker nashik marathi news