अखेर मका खरेदीचे रखडलेले १६ कोटी मिळाले; शेतकऱ्यांना 'इतक्या' कोटींचा लाभ 

 money for the purchase of maize was credited to the farmers account nashik marathi news
money for the purchase of maize was credited to the farmers account nashik marathi news
Updated on

नाशिक/येवला : किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगामात जिल्ह्यात प्रथमच आठ केंद्रावर मका खरेदी झाली. या खरेदीचे गेल्या दोन महिन्यापासून रखडलेले सुमारे 3 हजार शेतकऱ्यांचे 16 कोटी 11 लाख रुपये अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. याशिवाय ज्वारीचे देखील 13 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना 5 ते 6 कोटींचा लाभ

मागील वर्षी खरीपात बाजारात दर तेजीत असल्याने शेतकऱ्यांनी खाजगी बाजारातच मका विक्री केल्याने खरिपातील शासकीय मका खरेदी प्रक्रिया गुंडाळी गेली होती. याचा लाभ शेतकऱ्यांना कोरोनामुळे मकाचे दर घसरल्यावर झाला. नोव्हेंबर -डिसेंबर पर्यंत दोन हजार रुपये क्विंटलने विकणारी मका जानेवारीनंतर 1100 ते 1300 रुपयांपर्यंत घसरली होती.अशा स्थितीत मे मध्ये केंद्र शासनाने रब्बी मका खरेदीचा निर्णय घेतला अन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत प्रथमच 8 केंद्रावर रब्बी हंगामातील मका खरेदी करण्यात आली.मकाचे भाव पडल्याच्या काळात रब्बीतील खरेदीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5 ते 6 कोटींचा लाभ झाला आहे. 

अखेर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

बाजार भाव पाचशे ते सहाशे रुपये घसरजले असताना 1760 रुपये दराने झालेल्या खरेदीचा मोठा लाभ शेतकऱ्यांना झाला.विक्रीसाठी जिल्ह्यातील केंद्रावर 7 हजार 584 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 हजार 390 शेतकऱ्यांची खरेदी झाली तर 4 हजार 194 शेतकऱ्यांना मका विक्रीपासून वंचित राहावे लागले आहे. यातील पहिल्या टप्प्यात केवळ एक कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती.मात्र उर्वरित 91 हजार 568 क्विंटल मका खरेदीचे 16 कोटी 11 लाख रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी होते.त्या संदर्भात वारंवार मागणीही ही केली जात होती.अखेर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. याशिवाय पोर्टलवर नोंद झालेल्या 
277 क्विंटल ज्वारीचे ही 13 लाख 555 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. नव्या हंगामाच्या अगोदरच पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांनी सुस्कारा टाकला आहे.

“जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळाल्याने रब्बी हंगामात जिल्ह्यात 1760 रुपये दराने 97 हजार 219 क्विंटल मका खरेदी झाली आहे.यातील जूनमध्ये एक कोटी रुपये शेतकऱ्यांना आता केले होते. उर्वरित रक्कम 2 व 3 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.”
-विवेक इंगळे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी,नाशिक 

तालुकानिहाय अशी मिळाली रक्कम

तालुका - मका खरेदी (क्विं) - रक्कम
सिन्नर- 11319 - 1 कोटी 99 लाख 22 हजार
येवला - 16781- 2 कोटी 95 लाख 35 हजार
चांदवड- 14928 - 2 कोटी 62 लाख 73 हजार
नांदगाव -2099 - 36 लाख 95 हजार
मालेगाव -16850 - 2 कोटी 96 लाख 56 हजार
सटाणा - 9173 - 1 कोटी 61 लाख 44 हजार
देवळा - 9141 - 1 कोटी 60 लाख 89 हजार
लासलगाव -16295 - 2 कोटी 97 लाख 88 हजार
एकूण - 97 हजार 219 - 17 कोटी 11 लाख 

संपादन- रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com