सावधान! कोरोना बळींमध्ये पुरुषांचाच आकडा दुप्पट.. जिल्ह्यात महिलांच्या तुलनेत पुरुष दुपटीने कोरोनाग्रस्त 

नरेश हळणोर : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 मे 2020

नाशिक जिल्ह्यात 27 मार्चला कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर जिल्ह्यात सातत्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत गेली. 19 मेअखेरपर्यंत जिल्ह्यात 839 कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यात 42 रुग्णांचा बळीही गेला आहे. मात्र, कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत निम्म्याने कमी आहे.

नाशिक : जिल्ह्यात बाधित रुग्णांमध्ये महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांचे प्रमाण दुपटीने आहे. यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे 25 ते 40 वयोगटातील पुरुष सर्वाधिक बाधित असून, महिलांमध्ये 40 ते 60 या वयोगटाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मंगळवार (ता. 19)च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोनाबाधित 839 रुग्ण होते. यात महिलांचा आकडा 272 होता, तर पुरुषांची संख्या 567 होती म्हणजे दुप्पट आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे बळी गेलेल्या रुग्णांचा आकडा 42 असून, यातही महिलांपेक्षा दुपटीने पुरुषांचा बळी गेलेला आहे. 

गंभीर बाब म्हणजे...चाळिशीच्या आतील पुरुष सर्वाधिक बाधित 
नाशिक जिल्ह्यात 27 मार्चला कोरोनाग्रस्त पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर जिल्ह्यात सातत्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत गेली. 19 मेअखेरपर्यंत जिल्ह्यात 839 कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यात 42 रुग्णांचा बळीही गेला आहे. मात्र, कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत निम्म्याने कमी आहे. बाधित रुग्णांमध्ये पुरुषांचा आकडा दुपटीपेक्षा अधिक आहे. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे 26 ते 40 या वयोगटातील 233 पुरुष कोरोनाबाधित आहेत. याखालोखाल 40 ते 60 वयातील 172 पुरुषांची संख्या आहे. महिलांमध्ये 40 ते 60 वयात सर्वाधिक 92 महिलांना कोरोनाची लागण झाली असून, 26 ते 40 वयातील 80 महिला कोरोनाबाधित आहेत, तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे 42 मृत्यू झाले असून, यात 14 महिला आणि 28 पुरुषांचा समावेश आहे. यात 50 ते 60 वयोगटातील सर्वाधिक 17 बळी गेले आहेत. 

हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात 'हे' काय आढळले?

52 चिमुकल्यांना कोरोनाची बाधा 
कोरोना विषाणूपासून नवजात बालकांपासून 12 वर्षांखालील चिमुकलेही सुटलेले नाहीत. आतापर्यंत 52 चिमुकल्यांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 22 मुली आणि 30 मुलांचा समावेश आहे. यात सर्वांत कमी म्हणजे अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बालकाचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील वय-लिंगनिहाय बाधितांची संख्या 
* वयोगट * महिला * पुरुष 
0 ते 12       22        30 
13 ते 25     57        85 
26 ते 40     80        233 
41 ते 60     92        172 
61 ते 70     20        33 
70 वर्षांवरील 1         14 
एकूण :       272       567 
टक्‍केवारीतील प्रमाण : 32.41% 67.58% 
एकूण : 839 
(19 मे 2020 अखेरच्या आकडेवारीनुसार) 

हेही वाचा >  GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! 'हा' तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 

जिल्ह्यातील वय-लिंगनिहाय कोरोना बळींची संख्या 
* वयोगट * महिला * पुरुष 
20 ते 30     2         0 
31 ते 40     0         1 
41 ते 50     2         9 
51 ते 60     7        10 
61 ते 70     2         3 
70 वर्षांवरील 1       5 
एकूण :       14      28 
एकूण : 42 
(19 मे 2020 अखेरच्या आकडेवारीनुसार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more Males are corona positive than females in nashik district marathi news