#Lockdown : व्यवसाय झाला ठप्प अन् कुटुंब गावाकडे जाताना कारचा टायर फुटला.. जोरदार धडकेत मायलेक ठार!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने गावाकडे जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला, अशी अपघातस्थळी चर्चा होती. नाशिककडून येवलामार्गे पैठण तालुक्‍यातील बिडकीन गावाकडे जाधव कुटुंब चालले होते. अपघाताने जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला. कारचे मोठे नुकसान झाले. जोरदार धडक बसल्याने पुलावर असलेल्या लोखंडी पाइपाने थेट दरवाजा गाडीपासून वेगळा केला.

नाशिक / मुखेड : जळगाव नेऊर (ता. येवला) येथील नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील वनारसी नाल्यावरील पुलावर नाशिकवरून बिडकीन रामनगर (ता. पैठण)कडे जाणाऱ्या इंडिगो कार (एमएच 15, बीडी 3906)चे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात चिमुकल्यासह आई ठार झाली. तर तिघे जखमी झाले. जखमींना येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. कारमध्ये बिडकीन रामनगर येथील कुटुंबातील पाच सदस्य होते. ही घटना सोमवारी (ता.30) पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास घडली. 

अशी घडली घटना

कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने गावाकडे जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला, अशी अपघातस्थळी चर्चा होती. नाशिककडून येवलामार्गे पैठण तालुक्‍यातील बिडकीन गावाकडे जाधव कुटुंब चालले होते. अपघाताने जाधव कुटुंबावर मोठा आघात झाला. कारचे मोठे नुकसान झाले. जोरदार धडक बसल्याने पुलावर असलेल्या लोखंडी पाइपाने थेट दरवाजा गाडीपासून वेगळा केला. 

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

बिडकीन रामनगरचे मायलेक ठार 
अपघाताची माहिती समजताच येवल्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, सहाय्यक उपनिरीक्षक मच्छिंद्र पठाडे, गडाख यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व पंचनामा केला. टायर फुटल्याने वनारसी नाल्यावरील पुलाच्या लोखंडी पाइपला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की झालेल्या कर्णकर्कश आवाजाने परिसरातील शेतकरी तत्काळ मदतीसाठी धावले. अपघातात गीता जाधव (वय 28), त्यांचा मुलगा विराज जाधव (4) जागीच ठार झाले, त्यांचे पती विनोद जाधव (31) जखमी झाले. 
हे कुटुंब नाशिकला भांड्यांचा व्यवसाय करीत होते, असे समजते.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother and son killed accident at jalgaon neur Nashik Marathi news