esakal | ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं
sakal

बोलून बातमी शोधा

gokul.png

खंबाळे (ता. इगतपुरी) शिवारात मासेमारी करिता गेलेल्या कातकरी समाजाच्या युवकाला सोमवार (ता. 30) रोजी सकाळी दहा वाजता विजेचा करंट लागल्याने जीव गमवावा लागल्याची घटना घडली. तर एक गंभीर जखमी झाला त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ह्रदयद्रावक! 'ते' दोघं मज्जाक - मस्ती करत घराकडे निघाले...मात्र, वाटेत काळाने अडवलं

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : खंबाळे (ता. इगतपुरी) शिवारात मासेमारी करिता गेलेल्या कातकरी समाजाच्या युवकाला सोमवार (ता. 30) रोजी सकाळी दहा वाजता विजेचा करंट लागल्याने जीव गमवावा लागल्याची घटना घडली. तर एक गंभीर जखमी झाला त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

असा आहे प्रकार

तालुक्यातील उंबरकोन येथील युवक गोकुळ दशरथ मुकणे (वय 24) हा भाऊराव मुकणे (वय 23)या आपल्या लहान भावासह कावनई येथे गेला होता. अशातच जेवणासाठी मासेमारी करण्यासाठी दोघेही खंबाळे शिवारात दारणा नदी पत्रात गेला असता मासेमारी करून घरी परततांना शेतावर असलेल्या वीज वाहक तारांचा गोकुळ ह्यास स्पर्श होताच तो जाग्यावर मयत झाला. तर दुसरा युवक गंभीररीत्या शॉक लागल्याने जखमी झाला. घटनेची माहिती शेतकऱ्यांना होताच तातडीने त्यांनी वीजपुरवठा खंडित करत जखमी भाऊराव मुकणे ह्यास घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. 

हेही वाचा > 'लॉकडाउनमध्ये सिलेंडर संपलंय?'...काळजी नको, कारण...

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देत परिस्थिती हाताळली व जखमीस ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.  

हेही वाचा > #Lockdown : ...अन् अडकलेल्या 'त्या' गर्भवतीच्या मदतीला 'ते' देवदूतासारखे धावून आले!

go to top