ह्रदयद्रावक.."लेकरू माझं उपाशी आहे..भीक मागते तुमच्यापुढे" हताश झालेल्या माऊलीने उचलले 'असे' पाऊल

NSK20F67390_pr.jpg
NSK20F67390_pr.jpg

नाशिक / मालेगाव : लॉकडाउनच्या आर्थिक दुष्परिणाम पुढे येउ लागले आहेत. मालेगावला आतापर्यत आर्थिक विवंचनेतून तीन आत्महत्या झाल्याचे पुढे आले आहे. आज सोमवारी (ता. 15) रमजानपुर भागात अतिशय हदय पिळवटून टाकणारा प्रकार पुढे आला. 

हदय पिळवटून टाकणारा प्रकार...माता झाली हताश
लॉकडाउनच्या आर्थिक विवंचनेमुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविता येत नाही म्हणून आत्महत्या सुरु झाल्या आहेत. आज मालेगावला एक प्रकार हदय पिळवटून टाकणारा आहे. रमजानपुरा भागात फातमा जमील अहमद (23, रा. रमजानपुरा)हिचा पती जमील अहमद मिळेल ते काम करीत होता. मात्र, कामातून आलेल्या पुरेसे पैसे येत नसल्याने फातमा त्रस्त होती. तिला अडीच वर्षाची मुलगी आहे. लॉकडाउन नसताना रमजानपुरा व परिसरात मिळेल ते मागून ती उदरनिर्वाह करीत होती. लॉकडाउनमुळे त्यावरही परिणाम झाला. रविवारी सायंकाळनंतर ती परिसरात फिरली. फातमाला अवघे दहा रुपये मिळाले. त्या पैशातून तिने दूध आणून मुलीला पाजले. नंतर पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. या विवाहितेने पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रमजानपूरा भागातील त्रस्त  विवाहितेला लेकराला दूधासाठी पैसे नसल्याने तिने भीक मागावी लागली. अवघी 10 रुपयेच मिळालेल्या महिलेने दहा रुपयातून लेकराला दूध पाजून त्यानंतर स्वता जीवण संपविल्याचा प्रकार पुढे आला. तिसरी आत्महत्या आहे.

आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या
दुसऱया घटनेत पान दुकानदारांने आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. संगमेश्वर भागातील प्रदीप खैरनार (45, रा. पवननगर) हे पानदुकान चालवून कुटुंबाचा चरितार्थ करीत होते. तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवंचना वाढली होती. त्यातून नैराश्‍य, आर्थिक विवंचनेमुळे प्रदीपने सोमवारी पहाटे आपल्या मृत्युला कोणाला जबाबदार धरू नये. आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून स्वत:ची जीवनयात्रा संपवली. या चिठ्ठीत पत्नीने मुलांना शिकवावे व मित्रांना निरोप देणारा मजकूर आहे. छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे. 

रिक्षाचालकाची आत्महत्या
दोन दिवसांपूर्वी अख्तराबाद भागातील शेख नासीर शेख वजीर (52) या रिक्षाचालकाने व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक विवंचनेमुळे घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रविवारी दातारनगर भागातील महजबीन कमरुजमा मोहंमद शफी (वय 16, रा. मिरादातार नगर) या मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com