"सासू नेहमी घालून-पाडून बोलायची" सुनेने टाकला सासूच्या डोक्यात रॉड...अन् मग..

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मंदाकिनी पाटील या नेहमीच सून छाया हिला घालून-पाडून बोलायच्या आणि तू सतत लाव्यालाव्या करतेस, असे म्हणायच्या. त्याचा राग सून छाया हिच्या मनात होता. 1 फेब्रुवारीला सकाळी तिचा पती सचिन व पुतणी प्राची हे कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. त्या वेळी घरात दोघी सासू-सुनाच होत्या. मंदाकिनी पाटील या अंघोळ करून किचनमधील देवघरासमोर देवपूजा करीत बसल्या असताना....

नाशिक : दहा दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह मंगळवारी (ता. 11) सापडल्यानंतर अवघ्या 24 तासांत उपनगर पोलिसांनी खुनाची उकल केली आहे. सासू बोलते म्हणून 19 वर्षीय सुनेनेच डोक्‍यात लोखंडी रॉड मारून खून करून मृतदेह पोत्यात टाकून रिकाम्या प्लॉटमध्ये टाकून दिल्याची कबुली संशयित सुनेने दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसांत संशयित सुनेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा घडला प्रकार..

मंदाकिनी वसंतराव पाटील (मेधणे) असे मृत महिलेचे नाव असून, छाया सचिन पाटील (मेधणे) ऊर्फ छाया रमेश धुमाळ (वय 19) असे संशयित सुनेचे नाव आहे. 1 फेब्रुवारीला उपनगर पोलिसांत मंदाकिनी पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल आहे. मंगळवारी (ता. 11) सकाळी पाटील कुटुंबीयांच्याच घरासमोरील रिकाम्या प्लॉटमध्ये प्लॅस्टिकच्या गोणीत मंदाकिनी पाटील यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनाक्रम आणि घरातील सदस्यांमधील जाबजबाबातून संशयित कुटुंबीयांपैकीच एक असण्यापर्यंत पोलिस पोचले. पोलिसी खाक्‍यानुसार कसून चौकशी केल्यानंतर संशयित सून छाया पाटील हिने खुनाची कबुली दिली. 

सासू बोलते म्हणून... 
संशयित छाया ही मृत मंदाकिनी पाटील यांचा लहान मुलगा सचिन यांची पत्नी. छाया ही सचिनची दुसरी पत्नी. मंदाकिनी पाटील या नेहमीच सून छाया हिला घालून-पाडून बोलायच्या आणि तू सतत लाव्यालाव्या करतेस, असे म्हणायच्या. त्याचा राग सून छाया हिच्या मनात होता. 1 फेब्रुवारीला सकाळी तिचा पती सचिन व पुतणी प्राची हे कामानिमित्ताने घराबाहेर गेले होते. त्या वेळी घरात दोघी सासू-सुनाच होत्या. मंदाकिनी पाटील या अंघोळ करून किचनमधील देवघरासमोर देवपूजा करीत बसल्या असताना, संशयित छाया हिने लोखंडी रॉडने मंदाकिनी पाटील यांच्या डोक्‍यात वार केला. यात त्या जागीच ठार झाल्या. त्यानंतर संशयितेने त्यांचा मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीत टाकून साडीने गोणीचे गाठोडे बांधले आणि ते गाठोडे घरासमोरील मोकळ्या प्लॉटमध्ये फेकून दिले होते. तेच गाठोडे दहा दिवसांनंतर दुर्गंधीमुळे सापडले होते. 

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

याच दिशेने तपास सुरू
मृताच्या अंगावर दागिने तसेच असल्याने उद्देश चोरीचा नव्हता. मृतदेह घरापासून अवघ्या काही अंतरावर मिळाल्याने घरातील कोणीतरी हे कृत्य केले, याच दिशेने तपास सुरू केला. त्यानुसार सुनेनेच हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. - विजय खरात, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन  

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother-in-law murdered by daughter in law hitting a rod on head Nashik Crime News