esakal | माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच

बोलून बातमी शोधा

jyoti rathi.png}

नाशिकला पोचल्यावर फोन करते, असे वडिलांना सांगूनही फोन न आल्याने त्यांनी तिच्या पतीशी संपर्क साधला. मात्र, तिचा मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर दाखवत असल्याचे समोर आले.

माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच
sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (नाशिक) : आजारी वडिलांना भेटायला आलेली विवाहिता अडीच वर्षांच्या चिमुकलीसह सासरी जायला निघाली. शेजारच्या तरुणाने तिला बसस्थानकात पोहचविले. घरी पोचल्यावर फोन करते म्हणाली मात्र फोन काही केलाच नाही. घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच. वाचा नेमके काय घडले?

असा आहे प्रकार

नांदूरशिंगोटे येथून नाशिककडे प्रवास करणारी २३ वर्षीय विवाहिता आपल्या अडीच वर्षांच्या बलिकेसह बेपत्ता झाल्याचा प्रकार रविवारी (ता.३) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. ज्योती योगेश राठी (वय २३) व जिया योगेश राठी (अडीच वर्षे) या मायलेकी शनिवारी (ता. २) मऱ्हळ येथे वडील विनोद चरखा आजारी असल्याने भेटण्यासाठी आल्या होत्या. एक दिवस मुक्कामी राहिल्यावर रविवारी (ता. ३) दुपारी दोनला शेजारच्या युवकाने मायलेकींना नांदूरशिंगोटे येथील बसस्थानकात पोचवले. नाशिकला पोचल्यावर फोन करते, असे वडिलांना सांगूनही फोन न आल्याने त्यांनी तिच्या पतीशी संपर्क साधला. मात्र, तिचा मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर दाखवत असल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत नाशिक व परिसरातील नातेवाइकांकडे चौकशी केल्यानंतर वावी पोलिस ठाण्यात मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. 

पोलिस ठाण्यात मायलेकी बेपत्ता झाल्याची तक्रार

ज्योती रंगाने गोरी असून, उंची १६० सेंटिमीटर आहे. सडपातळ बांधा, मानेच्या उजव्या बाजूला तीळ, अंगात लाल साडी व ब्लाऊज परिधान केले आहे. तर जियाच्या अंगात निळा टी-शर्ट व पँट आहे. तिच्या डोक्याचे केस तांबडे आहेत. या वर्णनाची महिला व बालिका आढळून आल्यास वावी पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी केले आहे. 

हेही वाचा > मैत्रीत मोठा घात! मित्राच्याच डोक्यात घातला मोठा दगड; नशेत सांगितली धक्कादायक आपबिती

शेवटचे लोकेशन अशोकस्तंभ... 

पोलिसांनी ज्योतीच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता गुरुवारी दुपारी नाशिक रोड, द्वारका व शेवटचे लोकेशन अशोकस्तंभ दाखवण्यात आले आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहे.  

हेही वाचा >  डोळ्यासमोर काळ अन् गळ्याभोवती बांधलेल्या स्टोलमुळे वाचली तरुणी; अंगावर काटा आणणारी घटना