धक्कादायक! मुलाचा दफनविधी आटोपताच मातेनेही...मनाला चटका लावणारी आणखी एक बातमी

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 10 July 2020

 पुत्र वियोगाचा धक्का सहन न झाल्याने आणखी एका मातेचेही निधन झाले. पुत्रापाठोपाठ दोन्ही मातांनी निरोप घेतल्याने मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक / मालेगाव :  पुत्र वियोगाचा धक्का सहन न झाल्याने आणखी एका मातेचेही निधन झाले. पुत्रापाठोपाठ दोन्ही मातांनी निरोप घेतल्याने मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे.

मुलापाठोपाठ मातेचाही दफनविधी

प्रसिध्द दुरचित्रवाणी कलावंत अल अमीन यांचा दिव्यांग बंधू शेख अब्दुल करीम उर्फ पिंटु याचे हृदयविकाराने निधन झाले. त्याचा दफनविधी आटोपून कुटुंबिय व आप्तेष्ट घरी परतले तोच पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने पिंटु यांच्या मातोश्री पीईएस इंग्लिश मिडीयम स्कुलच्या निवृत्त शिक्षिका डी. के. अंजुम उर्फ अंजुम मीस (64) यांचे हृदयविकाराने निधन झाले. मुलापाठोपाठ त्यांचाही दफनविधी करण्यात आला. 

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

दुसरी घटना.. अवघ्या अर्धा तासातच मातेचा जगाचा निरोप...

मालेगावच्या आझादनगर भागातील हाजी अब्दुल रशीद यांना गेल्या सोमवारी हृदयविकाराने खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या अर्धा तासातच त्यांच्या मातोश्री शमशादबी अब्दुल रज्जाक (वय 70) यांचेही निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. माता पुत्रांवर बडा कब्रस्तानात एकाच वेळी दफनविधी झाला.

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother shocked and died after child death malegaon nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: