मुलाला भेटायची तिची इच्छा राहिली कायमचीच अपूर्ण...गोंदे दुमाला फाट्यावर भयंकर अपघात

gonde dumala acc 1.png
gonde dumala acc 1.png
Updated on

नाशिक / वाडीव-हे : मुंबई आग्रा महामार्गा वरील गोंदे दुमाला ता.इगतपुरी फाट्यावर आयशर ट्रकने मागुन धडक दिल्याने आई ठार मुलगा व नात जखमी झाले आहे.

असा घडला प्रकार
शुक्रवारी सकाळी (ता.१०) 10 वाजता नाशिकहुन गोंदेदुमाला येथे रहात असलेला मुलगा भरत सुर्वे  याच्याकडे जाण्यासाठी आई, दुसरा मुलगा आणि नात असे कुटुंब दुचाकी क्रमांक एम.एच 15 बी पी 7973 ने जात होते. यावेळी गोदेंदुमालाकडे वळताना नाशिकहुन मुंबईकडे भरधाव वेगात जात आसलेल्या आयशर ट्रक क्रमांक एम एच 18 बी जी 5685 ने ब्रेक न मारता दुचाकीला मागुन धडक दिली. या अपघातात (रा.बोराळे) जिल्हा वाशिम येथील दुचाकी चालकाची आई नंदाबाई जनार्दन सुर्वे (वय 50) या ठार झाल्या. मुलगा दुचाकी चालक विलास जनार्दन सुर्वे (वय 25) व त्याची मुलगी भावना विलास सुर्वे (वय 9) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमीना नरेन्द्रस्वामी सेवाभावी संस्थेच्या रूग्णवाहीका चालक निवृत्ति गुंड यानी रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाडीव-हे पोलीस ठाण्यात आपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Computer Typing Exam
The Saptashrungi–Nanduri Ghat road has been closed for three days as a precaution against landslides and flooding.
What happened in the Sinnar FDA raid?
Samir Bhujbal latest Yeola political news
Marathi News Esakal
www.esakal.com