नाशिकला लवकरच उभारणार लॉजिस्टिक पार्क; देशातील ३५ शहरांत समावेश

Logistic Park.
Logistic Park.

नाशिक : केंद्र सरकारने देशात ३५ लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून पहिल्याच टप्यात नाशिकचा समावेश आहे. सुमारे शंभर एकर जागेवर लॉजिस्टिक पार्क प्रकल्प होणार असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार तर शेतकरी, लघू उद्योजकांच्या मालांसाठी कोल्ड स्टोरेज, वेअर हॉउस उभारला जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. 

जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना

जिल्ह्यातील लॉजिस्टिक पार्कसाठी खासदार गोडसे यांचा केंद्र शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा सुरु होता. जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, भाजीपाला उत्पादनासह सात ते आठ मोठ्या औद्यागिक वसाहती असून द्राक्ष आणि कांदा साठवणुकीची व्यवस्था नसल्याने शहरालगत लॉजिस्टिक पार्क उभारण्याची मागणी होती. हा प्रकल्प येत्या दोन वर्षात कार्यान्वित होणार असून लॉजिस्टिक पार्क मुळे जिल्ह्याचाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार असून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. 
 

७ टक्के खर्च कपात 

नाशिक शहरात रेल्वे स्थानक, राष्ट्रीय महामार्ग तसेच महामार्ग असल्याने केंद्र शासनाच्या लॉजिस्टिक पार्कसाठी सुमारे पाचशे कोटीची गुंतवणूक होणार आहे. प्रकल्पासाठी लवकरच तांत्रिक सल्लागार समिती नियुक्त केली जाणार आहे. तांत्रिक सल्लागार समितीचा अहवाल मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रकल्पात शेतकरी, लघू उद्योजक तसेच कारखानदार यांच्या मालाच्या सोयीसुविधांसाठी कोल्ड स्टोरेज, वेअर हॉऊस आदी सामुग्री उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कारखाने, शेतमाल यासह अन्य उत्पादित मालावर आकारण्यात येणारी कॉस्ट इतर विकसित देशांप्रमाणे केवळ ८ टक्क्यांवर येणार आहे. जो की सध्या १५ टक्के आकारला जातो. 



केंद्रीय सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने नाशिकची निवड केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळणार आहे. कारखान्यात उत्पादित होणाऱ्या मालापासून ते कृषी उत्पादनावर लादली जाणारी किंमत कमी होऊन ८ टक्यांनी उत्पन्नात वाढण्यास मदत होणार आहे. येत्या दीड वर्षांत प्रत्यक्ष लॉजिस्टिक पार्क कार्यान्वित होऊन रोजगार उपलब्ध होणार आहे. 
- खासदार हेमंत गोडसे, नाशिक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com