महावितरणच्या अधिकाऱ्यास लाच घेताना अटक; सापळा रचून पकडले रंगेहाथ

अमोल खरे
Thursday, 1 October 2020

तक्रारदार यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तकार दिली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यानुसार सापळा रचला.

नाशिक / मनमाड : शेतीसाठी विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी, कोटेशन मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भगवान गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. 

कोटेशन मंजूर करण्याकरिता मागितली लाच
तक्रारदार यांनी शेतीसाठी विजेचे ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे कोटेशन कार्यालयात दाखल केले होते. सदर कोटेशन मंजून करण्याकरिता दोन हजार रुपये व ट्रान्स्फॉर्मर बसविल्यानंतर पाच हजार रुपये, अशी एकूण सात हजार रुपये लाचेची मागणी वीज वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ भगवान गायकवाड यांनी तक्रारदारांकडे केली होती. 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

रचला सापळा; पकडले रंगेहाथ
याबाबत तक्रारदार यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तकार दिली असता, बुधवारी (ता. ३०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यानुसार सापळा रचला. या वेळी तक्रारदार याच्याकडून पंचसाक्षीदार यांचे समक्ष चांदवड रोडवरील सरकार आटो इलेक्ट्रिक दुकानासमोर दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गायकवाड यांना अटक केली.  

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL official arrested for taking bribe nashik marathi news