फुकट वीज वापरणाऱ्यांवर महावितरणची कारवाई; सव्वातीन लाखांचा दंड वसूल

माणिक देसाई
Sunday, 17 January 2021

याची गंभीर दखल घेत महावितरणचे नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, चांदवडचे कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, निफाडचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड येथे पथक तयार करण्यात आले. 

निफाड (नाशिक) : निफाड येथील महावितरणच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत निफाड उपविभागात ३२ अनधिकृत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांडून तीन लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

सव्वातीन लाखांचा दंड वसूल 

निफाड उपविभागांतर्गत अनधिकृत क्षमतेपेक्षा जास्त वीज वापरामुळे रोहित्र केबल जळणे, बॉक्स, फ्यूज खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अधिकृत नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना विनाकारण कमी दाबाचा वीजपुरवठा, विजेपासून वंचित राहण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत महावितरणचे नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, चांदवडचे कार्यकारी अभियंता रवींद्र आव्हाड, निफाडचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड येथे पथक तयार करण्यात आले. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

३२ ग्राहकांच्या घरी धडक कारवाई 

या पथकात गुणवत्ता व नियंत्रक सहाय्यक अभियंता आनंदा मोरे, कक्ष अभियंता गणेश कुशारे, राहुल पाटील, पूजा वाळूंज, गायत्री चव्हाण व जनमित्रांचा समावेश होता. या पथकाने निफाड उपविभागात अनधिकृतपणे वीजवापर करणाऱ्या ३२ ग्राहकांच्या घरी धडक कारवाई केली. या ग्राहकांकडून एकूण तीन लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. दंडाची रक्कम निर्धारित वेळेत न भरल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL takes action against Stealing electricity users nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: