
नाशिक : शहरात कोरोनारुग्णांपैकी जवळपास ३ टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत आढळून येत आहेत; परंतु त्यांनादेखील व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने व येत्या काळात रुग्णांची संख्या वाढणार असल्याच्या सूचना लक्षात घेता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी वैद्यकीय व आरोग्य विभागाचेच ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचेही ऑडिट
त्याचबरोबर ऑक्सिजनचे बेड निर्माण करणे व पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या टाक्या बसवून ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित करण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी पहिल्या दिवसापासून कोविड नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले आहे; परंतु गेल्या आठ दिवसांत रुग्णालये, रुग्णालयांमधील बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आदींबाबतची वास्तववादी आकडेवारी मिळत नाही. पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ही आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे; परंतु एका अधिकाऱ्याकडून एक व दुसऱ्या अधिकाऱ्याकडून भलतीच आकडेवारी मिळत असल्याची बाब समोर आली.
ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी मोठ्या टाक्या
त्याव्यतिरिक्त ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर व पंतप्रधान केअर फंडातून महापालिकेला प्राप्त झालेले १५ व्हेंटिलेटर धूळखात पडल्याची बाब दोन दिवसांपूर्वी समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त जाधव यांनी वैद्यकीय विभागाकडील सामग्रीचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. मे ते ऑगस्ट महिन्यात विक्रमी रुग्णांची नोंद झाली. या काळात किती बेड उपलब्ध करून देण्यात आले? महापालिकेकडे किती व्हेंटिलेटर आहेत? यातील शासकीय वगळता अन्य व्हेंटिलेटर कुठून प्राप्त झाले? प्राप्त झालेले व्हेंटिलेटर कुठे लावले? याबाबत लेखी माहिती विभागप्रमुखांकडून मागण्यात आली असून, संपूर्ण वैद्यकीय विभागाचे सशक्तीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शहरात येत्या काळात कोरोनारुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेची रुग्णालये व कोविड सेंटर सक्षम केले जाणार आहेत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची संख्या येथे वाढविली जाणार आहे. -कैलास जाधव, आयुक्त, महापालिका
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.