esakal | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज! 10 टक्के बेड आरक्षित करण्याच्या सुचना
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus_isolation_ward__PT.jpeg

कोरोना वाढीचे संकेत मिळू लागल्याने राज्य शासनाने महापालिकेला पत्र लिहून तयारीच्या सुचना दिल्या. त्यानुसार वैद्यकीय विभागाने आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यास सुरुवात करताना खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी दहा टक्के अतिरिक्त बेड आरक्षित ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज! 10 टक्के बेड आरक्षित करण्याच्या सुचना

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : राजधानी दिल्ली सह गुजरात, राजस्थान राज्यांमध्ये कोरोना संसर्ग गतीने वाढतं असल्याने राज्य शासनाने महापालिकेला सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाने देखील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्येच्या आधारे रुग्णालयांमध्ये दहा टक्के अतिरिक्त खाटा वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

4 लाखांहून अधिक नागरिकापंर्यंत तपासणी मोहिम

मार्च महिन्यात देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. नाशिक मध्ये सहा एप्रिलला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्प्याटप्प्याने रुग्णांमध्ये वाढ होत गेली. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण वाढीच्या संख्येने जोर धरला. सातत्याने रुग्ण वाढत गेले. वाढती संख्या लक्षात घेता तत्कालिन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रॅपिड ॲण्टीजेट टेस्टच्या माध्यमातून रुग्ण शोध मोहिम हाती घेतली. सामाजिक संस्था व नगरसेवकांच्या माध्यमातून झालेल्या या रॅपिड ॲण्टीजेन टेस्टच्या माध्यमातून सतरा हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्याशी संपर्कात आलेल्या २४ नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तपासण्यात आले. या प्रमाणे चार लाखांहून अधिक नागरिकापंर्यंत तपासणी मोहिम पोहोचविण्यात आली. 

10 टक्के अतिरिक्त बेड आरक्षित ठेवण्याच्या सुचना

सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक रुग्ण सहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली याच महिन्यात मृत्युदर अधिक वाढल्याने अमरधाम मध्ये मृतदेह जाळण्यासाठी बेड उपलब्ध होत नव्हते. ऑक्सिजनच्या खाटाही कमी पडू लागल्या होत्या. सुदैवाने ऑक्टोंबर महिन्यात कोरोना वाढीचा आलेख झपाट्याने खालावला परंतू हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिले. दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी बाहेर पडल्याने कोरोना संसर्ग वाढू लागला. दिल्ली, राजस्थान, गुजराथ, गोवा या राज्यांमध्ये दुसया लाटेचा प्रादुर्भाव जाणवू लागला. कोरोना वाढीचे संकेत मिळू लागल्याने राज्य शासनाने महापालिकेला पत्र लिहून तयारीच्या सुचना दिल्या. त्यानुसार वैद्यकीय विभागाने आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यास सुरुवात करताना खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी दहा टक्के अतिरिक्त बेड आरक्षित ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

सध्याची रुग्णालयांची स्थिती 

एकूण रुग्णालय- ८२ 
रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेड- ४,५५७ 
व्हेंटीलेटरची संख्या -२५९ 
आयसीयु बेडची संख्या - ५०३ 
ऑक्सीजन बेडची संख्या - १२९५ 

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

कोरोनाच्या दुसया लाटेला सामोरे जाण्यासाठी महापालिका सज्ज आहे. दहा टक्के अतिरिक्त बेड उपलब्ध करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शहरात बाहेरून येणायांची तपासणी करण्यासाठी स्क्रिनिंग सेंटर सुरु केले जाणार आहे.- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिक्षक, महापालिका.

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका