महापालिका शाळांबरोबरच शिक्षकही होणार स्मार्ट! अंदाजपत्रकात तरतूद, बससेवा सुसाट

sakal (23).jpg
sakal (23).jpg

नाशिक : खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिका शाळेतील विद्यार्थी टिकण्यासाठी शाळा स्मार्ट करण्याबरोबरच शिक्षकांनादेखील कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अंदाजपत्रकात तब्बल १३३.४५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर प्रस्तावित शहर बससेवेसाठी १०२ कोटी, तर गोदावरी स्वच्छतेसाठी आर्थिक तरतूद केली आहे. शहरात उत्तुंग इमारती उभ्या राहणार असल्याने त्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करून ९० मीटर अग्निशमन शिडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अंदाजपत्रकात तरतूद, बससेवा सुसाट; उंच इमारतींसाठी शिडी 
शहरात महापालिकेच्या १०२ शाळा असून, त्यात २८ हजार ४९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण विभागाकडून पुढील आर्थिक वर्षात नियोजन करताना पालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांचा कौशल्य विकास करून स्मार्ट स्कूल तयार करण्याची संकल्पना राबविली जाणार आहे. 

स्मार्ट स्कूल योजनेत महत्त्वाचे 
-महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना सायकल. 
-शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशिन व डिस्पोजल मशिन. 
-सीएसआर फंडातून शैक्षणिक साहित्य व सुविधा. 
-कन्या दत्तक योजनेतून मुलींच्या शिक्षणाचा दर्जा वाढविणार. 
-खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणवेश. 
-शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा व वॉटर प्युरिफायर. 
-निवासी वसतिगृहे, शालेय खेळणी. 
-शाळांमध्ये दर्जेदार स्वच्छतागृहांची उभारणी. 

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

परिवहन सेवेसाठी १०२ कोटी 
प्रस्तावित शहर बससेवेसाठी १०२.६८ कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रकल्पाला चालना मिळणार आहे. टर्मिनल, बसथांबे पायाभूत सुविधा, बस संचलनासाठी इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅसेंजर अनाउन्सिंग सिस्टिम, डिजिटल मार्ग फलक व डिजिटल सूचनाफलक, मुख्य नियंत्रण कक्ष, डिजिटल वेळापत्रक, जीपीएसद्वारे बसचे लोकेशन व भाडे आकारणी, स्मार्ट कार्ड देण्याची सुविधा, मोबाईल ॲप्लिकेशनवर माहिती पुरविणे, तक्रार निवारण सुविधांसाठी निधी खर्च केला जाणार आहे. 

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार

अग्निशमन शिडी 
राज्य शासनाने डिसेंबरमध्ये एकात्मिक शहर विकास नियंत्रण नियमावलीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार शहरात ७० मीटरपेक्षा अधिक उंच इमारती होणार असल्याने आग लागण्याची दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशमन दलासाठी २५ कोटी रुपये खर्च करून ६८ ते ७२ मीटर उंचीची अग्निशमन शिडी (टर्न टेबल लॅडर) खरेदी केली जाणार आहे. सिडको अग्निशमन केंद्र नूतनीकरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

दिल्लीच्या धर्तीवर मोहल्ला क्लिनिक 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्यसेवा भक्कम करण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे ८२.८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका रुग्णालयात कोरोनाचे निदान तत्काळ करण्यासाठी चार कोटी रुपये खर्च करून आरटीपीसीआर लॅब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दिल्ली शहराच्या धर्तीवर झोपडपट्टी भागात दहा मोहल्ला क्लिनिक सुरू केले जाणार आहेत. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने रुग्ण तपासणी व जेनेरिक औषधे देण्याचे नियोजन आहे. 

सिग्नलवर सीसीटीव्ही 
शहराच्या विविध भागांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. त्यातील ४२ सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून, कमांड कंट्रोल ॲन्ड मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com