थरारक! भाईच्या बर्थडेचं सेलिब्रेशन...हाय व्होल्टेज ड्रामा..अन् खून!

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 17 June 2020

 साहिल शेख भररस्त्यात सहकार्‍यांसमवेत आपला वाढदिवस साजरा करत होता. यावेळी दोघे जण आपल्या कारमधून जात असताना त्याठिकाणी गर्दी असल्याने एकाने कारचा हॉर्न वाजवला. अन् बस्स..तेवढचं निमित्त ठरलं ..त्यानंतर भाईच्या कार्यकर्त्यांचा हंगामा..हाय व्होल्टेज ड्रामा आणि थरारक घटना घडली.

नाशिक/ लासलगाव : साहिल शेख भररस्त्यात सहकार्‍यांसमवेत आपला वाढदिवस साजरा करत होता. यावेळी दोघे जण आपल्या कारमधून जात असताना त्याठिकाणी गर्दी असल्याने एकाने कारचा हॉर्न वाजवला. अन् बस्स..तेवढचं निमित्त ठरलं ..त्यानंतर भाईच्या कार्यकर्त्यांचा हंगामा..हाय व्होल्टेज ड्रामा आणि थरारक घटना घडली.

अशी घडली घटना...

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता.१६) जूनला रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान आकाश शेजवळ आणि चेतन बाळू बैरागी हे आपल्या कारमधून जात असताना साहिल इमरान शेख भररस्त्यात सहकार्‍यांसमवेत आपला वाढदिवस साजरा करत होता. त्याठिकाणी गर्दी असल्याने फिर्यादी आकाश यांनी कारचा हॉर्न वाजवला. त्यांचा राग येवून संशयितांनी फिर्यादी यांची गाडी थांबवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साहिल शेख याने त्याच्या हातातील चाकूसारख्या धारदार शस्त्राने आकाश शेजवळच्या कमरेला डाव्या बाजूस, मांडीवर वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेतन बैरागी मदतीसाठी आला असता साहिलसह इमरान शेख, फिरोज अकबर शहा, इम्रान सलीम सैयद, कृष्णा, रोहित शिरसाठ, अरुण माळी, राजू राजूळे, काळु लहाने, दत्तू जाधव व इतर दोन ते तीन संशयितांनी त्यास जबर मारहाण केली. साहिलने धारदार शस्त्राने चेतनच्याही पोटावर वार केल्याने तो ठार झाला.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

सहा जणांना घेतले ताब्यात

साहिल शेख भररस्त्यात सहकार्‍यांसमवेत वाढदिवस साजरा करत असतानाच रस्त्याने जाणार्‍या वाहनचालकाने कारचा हॉर्न वाजवत त्यांना बाजूला होण्यास सांगितले. याचा राग येऊन संशयितांनी कारमधील चेतन बाळू बैरागी (३०) या युवकाचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड माधव रेड्डी, सहायक पोलीस निरीक्षक के. टी. रंजवे यांसह लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करत सहा संशयितांना तातडीने ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in birthday celebration at lasalgaon nashik marathi news