नाल्यात कोसळलेल्या कारची तपासणी करताच...पोलीसांना बसला धक्का..प्रचंड खळबळ

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 14 May 2020

गुरूवार (ता.१४) सकाळी सटाणा येथील दोधेश्वर येथील घाटात एक कार नाल्यात कोसळली असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड , सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे , पोलीस उपनिरीक्षक गवई यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पण जेव्हा त्या कारजवळ पोलीस पोहचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. 

नाशिक : गुरूवार (ता.१४) सकाळी सटाणा येथील दोधेश्वर येथील घाटात एक कार नाल्यात कोसळली असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड , सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे , पोलीस उपनिरीक्षक गवई यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पण जेव्हा त्या कारजवळ पोलीस पोहचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. 

अशी घडली घटना...

आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दोधेश्वर येथील घाटात एक टाटा मांझा कार नाल्यात कोसळली असून या कारमध्ये एक मृतदेह असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाल्याने पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड , सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे , पोलीस उपनिरीक्षक गवई यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घेतली . दोधेश्वर घाटाच्या तीव्र उतारावर असलेल्या एका नाल्यामध्ये राजू सरदार यांची टाटा मांझा कार ( क्रमांक एम एच 04 ईए 2403 ) कलंडलेल्या अवस्थेत होती. या कारच्या मागील सीटवर छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला. पण याची माहिती घेतली असता तो मृतदेह सटाणा शहरातील बँड साहित्याचे व्यापारी व ग्राहक संघाचे माजी सभापती राजेंद्र (राजू) सरदार यांचा असून त्यांचा निघृण खून झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे सटाणा शहरासह तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन राजू सरदार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे .अधिक तपासासाठी नाशिक येथील ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू
कारच्या सीटखाली सरदार यांचा मोबाईल देखील आढळून आलेला आहे . डोक्यावर हत्यारांच्या सहाय्याने सरदार यांच्यावर वार करण्यात आले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. दरम्यान रात्री साडेदहा वाजता राजू सरदार घरातून जेवण करून बाहेर पडले होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.लॉकडाऊनमुळे राजू सरदार यांचे बँड साहित्याचे दुकान बंद असल्याने त्यांनी रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याची घरपोच विक्रीची सेवा सुरू केली होती.

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder case found in satana nashik crime marathi news