बापलेकच बनले शेतकऱ्याचा काळ; पिंपळदर येथील अंगावर काटा आणणारी घटना

रोशन खैरनार
Monday, 18 January 2021

बापलेकच शेतकऱ्याचा काळ बनल्याची घटना समोर आली आहे. काय घडले नेमके? पिंपळदर येथील घटनेने नागरिकही धास्तावले आहेत.

सटाणा (जि.नाशिक) :  बापलेकच शेतकऱ्याचा काळ बनल्याची घटना समोर आली आहे. काय घडले नेमके? पिंपळदर येथील घटनेने नागरिकही धास्तावले आहेत.

बापलेकच बनले शेतकऱ्याचा काळ

पिंपळदर शिवारात संजय पवार यांची गट क्रमांक २८ मध्ये एक एकर शेतजमीन आहे. शेतीच्या बांधावर गवत टाकल्यास जमीन खराब होईल, असे संजय पवार हे विक्रम दोधा पवार यांच्या पत्नी पमाबाई यांना सांगत होते. त्याचा राग येऊन विक्रम पवार यांनी संजय यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यांनी हातात लोखंडी फावडा, तर मुलगा विश्‍वनाथ पवार याने लोखंडी पाइपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संजय पवार गंभीर जखमी झाले.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी (ता. १७) दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, अजय महाजन, विजय वाघ, नवनाथ पवार, विलास मोरे तपास करीत आहेत.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

बापलेकाविरोधात खुनाचा गुन्हा

पूर्ववैमनस्य आणि शेतीच्या बांधावर गवत टाकण्याची कुरापत काढत लोखंडी पाइप व फावड्याने बेदम मारहाण करून संजय नामदेव पवार (वय ५०) या शेतकऱ्याचा खून केल्याची घटना पिंपळदर (ता. बागलाण) येथे शनिवारी (ता. १६) दुपारी एकला घडली. याप्रकरणी सटाणा पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित बापलेकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, दोघांना रविवारी (ता. १७) सायंकाळी अटक करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a farmer in an agricultural dispute nashik marathi news