VIDEO : थरारक! दरोडेखोर शिरलेत समजून गावकऱ्यांनी केली तिघांची हत्या..मृतांपैकी एक त्र्यंबकेश्वरचे महंत

palghar ghatna.png
palghar ghatna.png

नाशिक : मुंबईहून तिघेजण कारने दादरा नगर हवेलीमार्गे सुरतकडे जायला निघाले होते. लॉकडाऊनमुळे रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इको कार घेऊन ते निघाले आणि सायवन गड चिंचले रस्त्यावरून सुरतकडे चालले होते. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावात गस्त घालणार्‍या गावकर्‍यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. आणि मग जे काही घडले ते थरारक होते.

असा घडला धक्कादायक प्रकार
पालघर जिल्ह्याच्या काही भागात सध्या चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. यामुळे स्थानिक लोक रात्रीची गस्त घालत आहेत. संशयावरून गुरुवारी रात्री तर गावकर्‍यांनी तिघांचा जीव घेतला. 
मुंबईत कांदिवलीतुन तिघेजण कारने दादरा नगर हवेलीमार्गे सुरतकडे जायला निघाले होते. लॉकडाऊनमुळे रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इको कार घेऊन ते निघाले आणि सायवन गड चिंचले रस्त्यावरून सुरतकडे चालले होते. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान या गावात गस्त घालणार्‍या गावकर्‍यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गावकर्‍यांनी या तिघांना जबर मारहाण केली.

निघृण हल्ल्यात तिघांचाही मृत्यू

कासा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये घातले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गावकर्‍यांनी पोलिसांवरही हल्ला केला. तसेच पोलिसांच्या गाडीतच तिघांना पुन्हा दगड आणि लाकडाने ठेचून मारले. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. सुशिलगिरी महाराज (वय 30 वर्षे), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय 70 वर्षे) आणि चालक निलेश तेलगडे (वय 30 वर्षे) अशी तिघा मृतांची नावे आहेत. हल्लेखोरांनी इको कार आणि पोलिसांच्या तीन गाड्यांचीही तोडफोड केली. या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत.

तिघांमध्ये त्र्यंबकेश्वरचे महंत कल्पवृक्षगिरी महाराज, मृत्युची बातमी आल्याने भक्त परिवारांमध्ये हळहळ
त्र्यंबकेश्वर येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर टेकडीवर मौनी बाबा आश्रम आहे.याठिकाणी असलेल्या मौनीबाबा ब्रह्मलीन झाल्या नंतर महंत कल्पवृक्षगिरी याठिकाणी 25 वर्ष वास्तव्य करीत होते. त्यांचा कांदिवली  येथे आश्रम आहे. या प्रकरणी पालघर पोलीसांनी ओळख पटविण्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीसांशी संपर्क साधला होता. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले यांनी दिली. कल्पवृक्षगिरी यांच्या  मृत्युची बातमी आल्याने भक्त परिवारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेच्या विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही

कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे तीन साधुसंत त्यांच्या वाहनाने सुरत येथे एका साधुसंतांच्या अंतिम यात्रेला जात असताना त्यांना अडवण्यात आले त्यांची माहिती घेण्यात आली. व्हिडिओ बघितला स्पष्ट लक्षात येते की 70 वर्षाच्या महंताना कसे मारत आहे त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारीसुद्धा उपस्थित असून त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्या साधुसंतांना वाचण्याचा प्रयत्न केला नाही. यावरून महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघतात हे स्पष्ट होते. आज महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर या घटनेचा गंभीर पूर्ण विचारा नाहीतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल या घटनेच्या विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही -    कैलास दि देशमुख, संर्पक प्रमुख नाशिक,  बजरंग दल मठ मंदीर, विश्व हिंदू परिषद 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com