अखेर गूढ उकललेच! बायको पळविल्याच्या रागातून केला युवकाचा खून; सावरगाव येथील घटना

विनोद बेदरकर
Sunday, 11 October 2020

सावरगाव शिवारातील गंगापूर धरणाच्या पाटबंधारे विभागाच्या जागेतील खूनाचे अखेर गुढ उकललेच. 'त्याने माझी बायको पळून नेली होती, म्हणून त्याला संपविले' असे स्वत: आरोपीने कबूल केले. वाचा काय नेमक काय प्रकार?

नाशिक : सावरगाव शिवारातील गंगापूर धरणाच्या पाटबंधारे विभागाच्या जागेतील खूनाचे अखेर गुढ उकललेच. 'त्याने माझी बायको पळून नेली होती, म्हणून त्याला संपविले' असे स्वत: आरोपीने कबूल केले. वाचा काय नेमक काय प्रकार?

असा आहे प्रकार

दोन दिवसांपूर्वी त्याचा कुणीतरी खून करुन धरणालगतच्या पाटबंधारे विभागाच्या जागेवर फेकून दिल्याचे आढळून आले होते. यात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. नितीन टबाले (हरसूल ता. त्र्यंबकेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणाच्या तपासात मृतदेह हा हरसूल येथील एकाचा असून मृताचे एका विवाहीत महिलेशी संबध असल्याची माहीती पुढे आली. त्याचा तपास करतांना पोलिसांनी रविवारी (ता. 11) महादेवपूर (ता. नाशिक) येथील अशोक मोरे (वय ३३) या संशयिताला अटक केली. संशयित मोरे याच्या पत्नीला मृताने पळवून नेले होते. साधारण दोन महिने त्या महिलेसोबत राहत होता. त्यातून महिलेच्या पतीने रागातून खून केल्याचे उघडकीस आले आहे. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

गुन्हा दाखल

नाशिक पोलिसांनी महादेवपूर मनोली परिसरात संशयिताचा शोध घेतला. त्याची चौकशी केली सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर पत्नीला दोन महिने पळवून नेल्याच्या रागातून खून केल्याचे पोलिसांनी तपासात निष्पण केले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक के.के.पाटील यांच्या पथकाने हा तपास केला. 

हेही वाचा >  हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder in Savargaon out of anger over his wife's abduction nashik marathi news