महालखेडा शिवारात २७ वर्षीय महिलेचे एकटे राहणे बेतले जीवावर.. महिलेच्या खुनामागे कोण? पोलीसांचा तपास

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

महालखेडा शिवारात महिला एकटीच राहत होती. पहाटेच्या सुमारास राहत्या घरी या महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करत तिचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितिले. या महिलेच्या खुनामागे कोण आहे? खुनाचे नेमके कारण काय? हे शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे

नाशिक / येवला : महालखेडा शिवारात महिला एकटीच राहत होती. पहाटेच्या सुमारास राहत्या घरी या महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करत तिचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितिले. या महिलेच्या खुनामागे कोण आहे? खुनाचे नेमके कारण काय? हे शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे

काय घडले नेमके?

मालखेडा शिवारात मुखेड शिवरस्तालगत कल्पना अशोक सोनवणे एकट्याच राहत होत्या. गुरुवारी (ता. 9) पहाटेच्या सुमारास राहत्या घरी या महिलेवर तीक्ष्ण हत्याराने वार करत तिचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांतिले. या महिलेच्या खुनामागे कोण आहे? खुनाचे नेमके कारण काय? हे शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. खुनाची माहिती मिळताच मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे, तसेच मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंग साळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिशे, उज्ज्वलसिंग राजपूत, एस.व्ही. शिंदे आदींनी या ठिकाणी भेट देत तपास केला. 

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

दोघा संशयितांना ताब्यात

महालखेडा (ता. येवला) येथे शिवारात एकट्या राहणाऱ्या 27 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला. या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. कल्पना सोनवणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खूनप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a woman at Mahalkheda yeola nashik marathi news