आईवरून शिवीगाळ केल्याने तरुणाने केला खून; १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा

विनोद बेदरकर
Wednesday, 30 September 2020

आईवरुन शिवीगाळ केल्याच्या रागातून पोटात चाकू खुपसून खून केला. या प्रकरणी १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा झाली. काय घडले तेव्हा वाचा..

नाशिक : आईवरुन शिवीगाळ केल्याच्या रागातून पोटात चाकू खुपसून खून केला. या प्रकरणी १० वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा झाली. काय घडले तेव्हा वाचा..

असा घडला प्रकार
शहरात महापालिकेच्या तलवाडी जलशुध्दीकरण केंद्राच्या परिसरात २८ ऑगस्ट २०१७ ला संपत काशिनाथ कडाळे (दिंडोरी) व गणेश राजाराम जाधव (वय २६) यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यात, संपत कडाळे याने आईवरुन शिवीगाळ केल्याने त्याचा राग येउन गणेश उर्फ विन्या जाधव याने खिशातून चाकू काढून छातीवर वार करुन खून केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांतर्फे तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. राजू भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्ट्रीने भक्कम पुरावे सादर करीत, दोषारोपपत्र दाखल केले. नाशिक येथे जिल्हा सत्र न्यायधीश क्रमांक पाच व्ही.पी. देसाई यांच्या न्यायालयात सुनावणी होउन परिस्थितीजन्य पुराव्यानुसार संशयिता विरोधात आरोप स्पष्ट झाला. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

१० वर्षाची सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड

न्यायालयाने आज बुधवारी (ता.३०) दोन्ही बाजूच्या युक्तीवाद ऐकल्यानंतर गणेश जाधव याला १० वर्षाची सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास आणखी ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी पक्षातर्फे सरकारी वकिल एस.एस.कोतवाल यांनी कामकाज पाहिले. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder of young boy punished by court nashik marathi news