रक्ताच्या थारोळ्यात तरुण; खिशात मिळालेल्या मोबाईलवरून धक्कादायक खुलासा

युनूस शेख
Wednesday, 30 September 2020

 रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या खिशात मिळालेल्या मोबाईलवरील क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी या प्रकाराचा उलघडा झाला. काय घडले नेमके?

नाशिक : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या खिशात मिळालेल्या मोबाईलवरील क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी या प्रकाराचा उलघडा झाला. काय घडले नेमके?

खिशात मिळालेल्या मोबाईलवरून झाला खुलासा

हिरालाल प्रजापती (वय ३५, रा. मूळ नेपाळ, हल्ली माडसांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दहीपूल परिसरातील सरस्वतीनाला येथे तरुणाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाच्या खिशात मिळालेल्या मोबाईलवरील क्रमांकावर संपर्क केला. मृताचे नाव हिरालाला प्रजापती असून, सध्या तो माडसांगवी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. संशयित सराफ बाजाराच्या दिशेने पळाल्याची माहिती एका महिलेने दिली. मृताने अल्पवयीन मुलीशी अश्‍लील वर्तन केले होते. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. रागाच्या भरात संशयित दुचाकीवरून शोध घेत असताना दहीपूल भागात तो दिसला. संशयितांनी त्याला लागडी दंडुक्याने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय आहे. संशयित फरारी असून, त्यांचा शोध घेत आहे. दहीपूल परिसरात एका तरुणाचा सोमवारी (ता. २८) मध्यरात्री खून झाला.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

घटनास्थळी एकजण उपस्थितीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी चौकशीसाठी एकास ताब्यात घेतले आहे. मृताच्या नातेवाइकांचा तपास लागू शकला नाही. पोलिस शिपाई सचिन आहिरे यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. हिरालाल यास मारहाण करत असताना संशयित लहान मुलीशी गैरवर्तन केल्याचे बोलत होते. बहुदा त्यातूनच त्याचा खून झाला, अशी चर्चा दहीपूल परिसरात सुरू होती. मृताकडे असलेली सायकल न आढळल्याने पोलिस शोध घेत आहेत. भद्रकाली पोलिसांत दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

हिरालाल प्रजापती खूनप्रकरणी गुन्हा दाखल आहे. संशयितांच्या शोधात पोलिसांचे चार पथक तयार करण्यात आले आहे. चौकशीअंती खुनाचे निश्‍चित कारण सांगता येईल. -साजन सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a youth nashik marathi news