रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांचा असा आदर्श...जिल्हाधिकारींनी केले कौतुक!

eid wish from collector.jpg
eid wish from collector.jpg

नाशिक : (मालेगाव) रमजानसारख्या पवित्र महिन्यातच कोरोनासारख्या महामारीचे संकट शहरावर घोंगावत असतांना त्याचा मुकाबला करण्यासाठी शासन प्रशासनासोबत सर्व नागरिकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. या महिन्यामध्ये सर्व नागरिकांनी रमजानचे रोजे ठेवत घरातच नमाज अदा करुन एक चांगला आदर्श घालून दिला आहे. अशाच प्रकारे यापुढेही नागरिकांचे सहकार्य मिळेल असे आवाहन करीत शहरातील मुस्लिम बांधवांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी (ता.25) ईदनिमीत्त शुभेच्छा दिल्या.

महापौर व आमदारांची भेट 

ईद-उल-फित्र निमित्त सूरज मांढरे यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा शेख व माजी आमदार रशिद शेख यांच्यासह शहराचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद यांच्याही निवासस्थानी भेट देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लाचलुचपत विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी महापौर ताहेरा शेख यांनी नागरिकांचा जिव्हाळ्याचा व संवेदनशिल विषय मांडतांना त्या म्हणाल्या, नागरिकांच्या हाताला काम व पोटाला अन्न मिळाले पाहिजे. तर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद म्हणाले, शहरातील नागरिक हे आजपर्यंत जकातीचा महिना असल्यामुळे तारले गेले मात्र यापुढे कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत, अशी मागणी केली. 

प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन

श्री. मांढरे यांनी मालेगावातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सुविधा, पावरलूमच्या माध्यमातून रोजगार व शासनामार्फत अन्न धान्याचा पुरवठा करुन हे सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी शासनस्तरावरुन उपाययोजना करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले, रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्व दिले आहे. जगभरातील आरोग्य संघटना कोरोनाला हरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. यावर ठोस उपचार मिळत नाही तोवर प्रत्येकाने आरोग्य प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केले असून ते यापुढेही अपेक्षीत आहे. आरोग्य सेवा, रोजगार व अन्न धान्याच्या सुविधांसाठी प्रशासनामार्फत संपूर्ण तयारी करण्यात आल्याचेही सांगितले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com