गुड न्यूज : मविप्र लॅबमध्ये येणार आधुनिक मशीन...स्वॅबचे चक्‍क 'इतके' रिपोर्ट रोज मिळणार!

vasantrao pawar hospital.png
vasantrao pawar hospital.png
Updated on

नाशिक : मविप्रची लॅब असतानाही नाशिकमधील स्वॅब सध्या पुणे आणि धुळे येथील लॅबमध्ये पाठवले जात आहेत. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मविप्र संस्थेने पुढाकार घेतला असून संस्थेच्या टेस्ट लॅबची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती श्रीमती पवार यांनी दिली. त्या म्हणाल्या, या मशीनमुळे रोज किमान पाचशे अहवाल तरी हातात पडू शकतात. त्यामुळे नाशिक आणि मालेगावाच्या प्रलंबित अहवालांचा प्रश्‍न मार्गी लागेल.

सध्या रोज दिले जाताय 225 अहवाल

सध्याच्या काळात दर चार तासाला स्वॅबमधून 40 ते 45 मॅन्युअल आर. एन. ए. एक्‍स्ट्रॅक्‍शन केले जातात. अर्थात साधारणपणे 7 तासांत 90 आरएनए मिळतात. त्यानंतर आरटीपीसीआर मशीनद्वारे दोन तासांत 90 अहवाल मिळतात. यामुळे सुरुवातीच्या काळात 150 अहवाल देण्याचे बंधन होते. परंतु आता रुग्णसंख्या वाढल्याने लॅबद्वारे रोज 225 अहवाल दिले जात आहेत. त्यासाठी तीन सत्रांमध्ये 60 कर्मचारी काम करतात. लॅबसाठी मनुष्यबळ मविप्रचेच असून सामग्री मात्र शासन देते. ही सामग्री महिन्याची मिळाली तर विनाअडथळा काम सुरू होईल. मध्यंतरी दोन दिवस काम केवळ सामग्रीअभावी थांबवावे लागले होते. एकदा स्वॅब आम्हाला प्राप्त झाल्यास 48 तासांत त्यांचे अहवाल देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे आमच्या पातळीवर अहवाल देतांना कुठलाही विलंब होत नसल्याचे नमुद केले आहे.

72 पोलीस, सीआरपीएफ जवानांवर उपचार सुरू

मालेगाव येथील पोलीस आणि सीआरपीएफचे 72 पॉझिटिव्ह कर्मचारी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत. यापुढील काळात तीनशे पोलीस दाखल होऊ शकतील, अशी व्यवस्था करुन ठेवली आहे. या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था मविप्रकडूनच केली जात असल्याचेही श्रीमती पवार यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com