पिंपळगाव टोल नाक्यावर चालत्या कारने घेतला पेट; उपसरपंचाच्या पतीचा होरपळून मृत्यू.

car fire 345.jpg
car fire 345.jpg

पिंपळगांव बसवंत (जि.नाशिक) : पिंपळगावं टोलप्लाझा लगत असलेल्या साकोरे फाट्यावर कार लागलेल्या आगीत साकोरे मीग येथील द्राक्ष निर्यातदार संजय चंद्रभान शिंदे (वय 52 वर्षे)याचा होरपळुन मुत्यु झाला. साकोरे मीगच्या उपसरपंच निर्मला शिंदे यांचे ते पती होते. दुपारी बारावाजेच्या दरम्यान हा बर्निंग कार थरकाप उडविणारा थरार घडला.

कार लागलेल्या आगीत द्राक्ष उत्पादक संजय शिंदे यांचा होरपळुन मृत्यु

शॉकसर्किटने उडालेली ठिणगी व कारमध्ये असलेल्या सॅनिटायझरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.छाटणीनंतर द्राक्षबागेच्या फवारणीसाठी लागणारी औषधे घेण्यासाठी संजय शिंदे हे साकोरे येथील निवासस्थानातुन पिंपळगांवच्या दिशेने निघाले. त्यांची मारूती सियाज कार(क्र.एम.एच.15,एफ.एन.4177) साकोरा फाट्यावर महामार्गाला लागताच कादवा नदीच्या पुलाजवळ आली असता कारने पेट घेतला.

ज्वलनशील वस्तुमुळे वाढली आगीची तीव्रता 

आगीमुळे कारचे दरवाजे बंद झाले. कारमध्ये सॅनिटायझरच्या बाटलीसह डिझेल टाकी,व लेदरसिट कव्हर अशी ज्वलनशील वस्तु असल्याने आगीची तीव्रता वाढली. धुराचे लोट बाहेर पडु लागले. दरवाजे उघडण्याचा व काच फोडण्याचा शिंदे यांनी प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले. कारमध्ये धुर व आगीच्या ज्वालांनी संजय शिंदे होरपळुन निघाले व त्याचा गुदमुरून मृत्यु झाला. नागरिकांनी काच फोडुन शिंदे यांचा मुत्यदेह बाहेर काढले. पिंपळगांव अग्नीशामक दलाने आगीचा भङका विझविला. 

सुखदुखात धावणारे व्यक्तीमत्व हरपल्याची भावना 

अजातशत्रु व्यक्तीमत्व...दुर्घटनेत शिंदे यांच्या मृत्युने साकोरे गावावर शोककळा पसरली.समाजकारणात, राजकारणात सक्रिय असलेले संजय शिंदे हे अजातशुत्रु होते.राष्ट्रवादीच्या उपतालुकाअध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होते. साकोरे मीगच्या उपसरपंचपदी त्यांच्या पती निर्मला शिंदे यांची दोन महिन्यापुर्वी निवड झाली. साकोरे गावात विकासकामाचा संकल्प त्यांनी बोलुन दाखविला. सुखदुखात धावणारे व्यक्तीमत्व हरपल्याची भावना साकोरे मीगच्या नागरिकांनी व्यक्त केली.आई, पत्नी,दोन मुले,सुना असा त्याचा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com