हाउज द जोश! ४८ दिवसांत 'त्यांनी' पार केले पृथ्वी ते चंद्राइतकं अंतर; शुभेच्छांचा होतोय वर्षाव

nashik cyclist.png
nashik cyclist.png

नाशिक : पृथ्वीचा एकुलता एक उपग्रह. चंद्राचे शीतल चांदणे, त्याच्या कला, त्याचे मोहक स्वरूप वगैरे गुणांमुळे चंद्राबद्दल मानवाला पूर्वापार आकर्षण वाटत आले आहे. चंद्राची उपमा देत स्पर्श करावा असं सगळ्यांनाच वाटते. नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी 'मिशन टू मून' या उपक्रमांतर्गत एकप्रकारे चंद्रालाच स्पर्श केला आहे.

अभूतपूर्व उत्साह आणि प्रतिसाद... 

कोरोनाबद्दलची भीती अन् आरोग्याची काळजी यांमुळे समीकरण बदलत गेली. सुरक्षित अंतर ठेवत व लोकांचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी असोसिएशनने एक प्लॅन तयार केला. त्यात एकाच ठिकाणी न जमता योग्य सुरक्षित अंतर राखून 'मिशन फॉर हेल्थ' या उपक्रमात १ ऑगस्ट ते १४ ऑगस्टच्या दरम्यान ३०० किमीचे अंतर पार करण्याचे आव्हान सायकलिस्टसला देण्यात आले. त्यात ४४५ जणांनी भाग घेतला. त्यापैकी १९३ जणांनी ते लक्ष्य पूर्ण केले. सर्वांनी मिळून १,२५,७३३ किमीचं अंतर पूर्ण केले. त्यांचा अभूतपूर्व उत्साह आणि प्रतिसाद पाहून असोसिएशनने तो प्रवास वाढवून 'मिशन टू मून' म्हणून त्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत १० हजार किमी पूर्ण करण्याचे टार्गेट दिले. यात १६ ते ७२ वर्षांपर्यंतच्या वयाच्या स्त्री-पुरुषांना सायकल चालविली. ही चंद्र मोहीमसुद्धा केवळ ४८ दिवसांतच या सायकलिस्टने पूर्ण केली.

सायकलिस्टचा सन्मान...

प्रत्येक १ हजार, २ हजार, ३ हजार, ५ हजार आणि १० हजार किमी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टला सन्मानित केले जाते. आजपर्यंत ३ जणांनी ४ हजार पेक्षा जास्त, १० जणांनी ३ हजार पेक्षा जास्त, २८ जणांनी २ हजारपेक्षा जास्त आणि १२८ जणांनी १ हजार किमीपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. सहभागदेखील वाढून आता ८०० पेक्षा जास्त सायकलिस्टस या उपक्रमाशी जोडले गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com