काय बोलावं आता! जेव्हा चोराने जिल्हाधिकाऱ्यांचे मारले पाकीट; सर्वत्र एकच चर्चा

सतीश निकुंभ
Sunday, 3 January 2021

लग्न समारंभ म्हटलं की लोकांची गर्दी होतेच अन् याच गर्दीचा फायदा घेत बऱ्याचदा चोरीचे प्रकारही घडतात. मात्र निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट चोरीस गेल्याने पोलिसांची एकच धांदल उडाली.  

नाशिक : लग्न समारंभ म्हटलं की लोकांची गर्दी होतेच अन् याच गर्दीचा फायदा घेत बऱ्याचदा चोरीचे प्रकारही घडतात. दरम्यान निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या लग्नात चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट चोरीस गेल्याने पोलिसांची एकच धांदल उडाली.  

रविवारी (ता. ३) आमदार बनकर यांचे पुत्र अविनाश व वाजगाव (ता. देवळा) येथील मोनिका यांचा विवाह गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्समध्ये झाला. विवाह सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षांचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष

घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा

लग्न सोहळ्यास अनेक दिग्गज नेते तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित असल्याने, सर्वत्र सुरक्षा व्यवस्था अगदी चोख ठेवण्यात आली होती. मात्र गर्दीचा फायदा घेत भामट्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे पाकीट मारल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस बंदोबस्त तसेच सुरक्षारक्षक भोवतालीअसताना देखील मांढरे यांचे पाकिट अज्ञात चोरट्याने पळवल्याने घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. तसेच चोराचे हात व्हिआयपींच्या  खीशापर्यंत पोहचल्याने आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.  याबाबत गंगापूर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत तक्रार झाली दाखल नाही, पण पोलिस पाकीटमाराच्या शोधात असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा> गॅस गिझर भडक्यात बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबात आक्रोश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik District Collectors wallet was stolen during the wedding ceremony nashik marathi news