esakal | CoronaUpdate : नाशिक जिल्‍ह्‍यात नव्‍याने २ हजार ४८ कोरोना रूग्‍णांची भर; १६ बाधितांचा मृत्‍यू 
sakal

बोलून बातमी शोधा

nashik district corona updates marathi news

बुधवारी दिवसभरात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक १ हजार ३०५ रूग्‍णांचा समावेश आहे. त्‍यापाठोपाठ नाशिक ग्रामीणला ६७०, मालेगावला ४० तर जिल्‍हाबाह्य ३३ रूग्‍ण आढळून आले आहेत. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५७ हजार ९८८ झाला आहे.

CoronaUpdate : नाशिक जिल्‍ह्‍यात नव्‍याने २ हजार ४८ कोरोना रूग्‍णांची भर; १६ बाधितांचा मृत्‍यू 

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : गेल्‍या दोन दिवसांपासून जिल्‍हात बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या नव्‍याने आढळणार्या रूग्‍णांपेक्षा अधिक होती. परंतु बुधवारी (ता.१६) दिवसभरात नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांचा आकडा दोन हजार पार पोहोचला. दिवसभरात २ हजार ४८ नवीन बाधित आढळून आले, तर १ हजार ७२५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात सोळा रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. 

बुधवारी दिवसभरात नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक १ हजार ३०५ रूग्‍णांचा समावेश आहे. त्‍यापाठोपाठ नाशिक ग्रामीणला ६७०, मालेगावला ४० तर जिल्‍हाबाह्य ३३ रूग्‍ण आढळून आले आहेत. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५७ हजार ९८८ झाला आहे. तर कोरोनावर मात केलेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १ हजार ३३३, नाशिक ग्रामीणचे ३५५, मालेगावचे ३० तर जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. यातून बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या ४६ हजार ४०५ झाली आहे. दिवभरात झालेल्‍या सोळा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सहा, ग्रामीणचे नऊ, मालेगावच्‍या एका रूग्‍णाचा समावेश आहे. यातून मृतांचा आकडा १ हजार १०७ वर पोहोचला आहे. यातून सद्यस्‍थितीत जिल्‍ह्‍यात १० हजार ४७६ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

दोन हजारहून अधिक संशयित 

एकीकडे नव्‍याने आढळलेल्‍या रूग्‍णसंख्येने उच्चांक गाठलेला असतांना बुधवारी दिवसभरात आढळलेल्‍या संशयितांची संख्या लक्षणीय राहिली. केवळ नाशिक शहरातील महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २ हजार ०८१ रूग्‍ण आढळले आहे. तर नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १२६, मालेगाव रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ४१, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय २२, जिल्‍हा रूग्‍णालयात आठ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ५५२ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ९९६ रूग्‍ण नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संपादन- रोहित कणसे