चिंताजनक! जिल्ह्यात दिवसभरात ४१६ रुग्णांची भर...तीनच दिवसांत रेकॉर्डब्रेक नवे रुग्ण...!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

रविवारी (ता. १९) दिवसभरात नव्याने ४१६ पॉझिटिव्ह अहवाल आले असून, कोरोनामुक्‍त झालेल्‍या ३१२ रुग्‍णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्‍यान, दिवसभरात सात रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. आमदार नरेंद्र दराडे यांनाही कोरोनाची लागण झाल्‍याचे उघडकीस आले आहे. 

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्‍णांची संख्याही समाधानकारक आहे. रविवारी (ता. १९) दिवसभरात नव्याने ४१६ पॉझिटिव्ह अहवाल आले असून, कोरोनामुक्‍त झालेल्‍या ३१२ रुग्‍णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्‍यान, दिवसभरात सात रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. आमदार नरेंद्र दराडे यांनाही कोरोनाची लागण झाल्‍याचे उघडकीस आले आहे. 

दिवसभरात ३१२ रूग्‍ण झाले बरे

जिल्‍हाभरात आतापर्यंत उपचार घेऊन बरे झालेल्‍यांची संख्या सहा हजार ३५१ आहे. बरे होण्याचे हे प्रमाण ६७ टक्क्यांपर्यंत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. रविवारी आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांमध्ये शहरातील २९३, ग्रामीण भागातील ११४, मालेगाव महापालिका हद्दीतील आठ, तर अन्य जिल्ह्यांतील एका रुग्‍णाचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्येही सर्वाधिक २१७ नाशिक शहरातील, ४८ ग्रामीण भागातील, ४५ मालेगाव महापालिका हद्दतील, तर दोन रुग्ण अन्य जिल्ह्यांतील आहेत. 

जिल्ह्यातील मृतांची संख्या ३९०

रविवारी मृत्‍यू झालेल्‍या सात रुग्‍णांपैकी तिघे नाशिक शहरातील आहेत. त्यात दिंडोरी रोडवरील ५५ वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील ६० वर्षीय पुरुष, तर भारतनगर येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सिन्नर तालुक्यात दोघांचा, तर लखमापूर (ता. दिंडोरी) येथील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ३९० झाली आहे. आतापर्यंत जिल्‍हाभरात नऊ हजार ४९१ कोरोनाबाधित आढळून आले. त्‍यापैकी सहा हजार ३५१ रुग्‍ण बरे झाले आहेत. 

हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार

सलग तिसऱ्या दिवशी हजाराहून अधिक संशयित 

गेल्‍या तीन दिवसांपासून संशयित रुग्‍णांच्‍या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी रविवारी एक हजारहून अधिक संशयित रुग्ण जिल्हाभरातील विविध रुग्णालयांत दाखल झाले आहेत. त्यात, नाशिक शहरात ७९३, ग्रामीण भागात २३८, मालेगाव महापालिका हद्दीत १९, तर गृहविलगीकरणात शंभर, असे एकूण एक हजार १५० संशयित रुग्ण आढळून आले. 

हेही वाचा > दुर्देवी! धरणात पोहण्यासाठी गेलेल्या पोलीसासह दोन मित्रांचा बुडून मृत्यू...परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nashik district, the number of patients increased by 416 on Sunday nashik marathi news