वरुणराजाच्या हजेरीची शंभरी पार! नाशिक- पूर्व पट्ट्याला अतिवृष्टीचा दणका  

महेंद्र महाजन
Monday, 21 September 2020

यंदाच्या पावसाळ्यातील वरुणराजाच्या हजेरीची शंभरी पार झाली. १०१.८५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी १४७.६४ टक्के पाऊस झाला होता. रविवारी (ता. २०) सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत पूर्व पट्ट्यातील चांदवड, कळवण, देवळा आणि सिन्नर तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. 

नाशिक : यंदाच्या पावसाळ्यातील वरुणराजाच्या हजेरीची शंभरी पार झाली. १०१.८५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी १४७.६४ टक्के पाऊस झाला होता. रविवारी (ता. २०) सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत पूर्व पट्ट्यातील चांदवड, कळवण, देवळा आणि सिन्नर तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. 

वरुणराजाच्या हजेरीची शंभरी पार 
तालुकानिहाय गेल्या २४ तासांतील पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे असून (कंसात आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी ) ः नाशिक- १७.२ (९८.०६), इगतपुरी- २३ (१२०.७७), दिंडोरी- ४३ (८४.९९), पेठ- १९.२ (७३.२४), त्र्यंबकेश्‍वर- ३ (६२.४६), मालेगाव- ४७ (१७१.५४), नांदगाव- ४७ (१५५.५०), चांदवड- ७७ (११८.१९), कळवण- ७९ (९८.१८), बागलाण- ४० (१६८.३७), सुरगाणा- ३०.१ (७३.३५), देवळा- ७९.४ (१२८.४८), निफाड- ५३.५ (११९), सिन्नर- ७१ (१५०.६६), येवला- ३८ (१२८.९६). 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

धरणे भरली ९४ टक्के 
जिल्ह्यातील सात मोठी आणि १७ मध्यम, अशी २४ धरणे ९४ टक्के भरली आहेत. शंभर टक्के भरलेली धरणे अशी ः गंगापूर, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, गिरणा, माणिकपूंज. इतर धरणांतील जलसाठ्याची टक्केवारी याप्रमाणे ः कश्‍यपी- ७३, गौतमी गोदावरी- ८६, आळंदी- ९२, पालखेड- ९७, करंजवण- ८६, वाघाड- ८७, ओझरखेड- ७३, पुणेगाव- ९६, तिसगाव- ७७, मुकणे- ८३, नांदूरमध्यमेश्‍वर- ९१, चणकापूर- ९८, पुनंद- ९९. दरम्यान, गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये जलसाठा ९९ टक्के झाला होता. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO
धरणांमधून विसर्ग सुरू 
पालखेडमधून ४३७, दारणामधून ७५०, भावलीतून ७३, वालदेवीमधून १०७, कडवामधून २१२, नांदूरमध्यमेश्‍वरमधून आठ हजार ७०, भोजापूरमधून ३८, चणकापूरमधून ९०८, हरणबारीमधून ५२३, नाग्यासाक्यामधून एक हजार १३०, गिरणामधून सात हजार ४२८, पुनंदमधून ६८० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पावसाची हजेरी कायम राहिल्यास धरणांमधून विसर्ग वाढवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Heavy rains marathi news