अमर रहे! काश्मीरमध्ये देशसेवा करताना नाशिकच्या जवानास वीरमरण

jawan appa mate.jpg
jawan appa mate.jpg

नाशिक : जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये देशसेवा करीत असताना, नाशिकच्या जवानास वीरमरण आले. सीमा सुरक्षा बलाचे जवान आप्पा मधुकर मते (वय ३६) यांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वीरमरण आले. ही वार्ता बुधवारी (दि.८) सकाळी गावात येऊन धडकली. आणि परिसरात शोककळा पसरली. जवान मते यांचे पार्थिव विमानाने गुरुवारी (दि.९) सकाळ पर्यंत नाशिकला आणले जाणार असून, त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर आडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वीरमरण
नाशिकच्या आडगाव येथील भूमिपुत्र आप्पा मधुकर मते सन २००५ मध्ये सीमा सुरक्षा बलाच्या ३१ बटालियन मध्ये रुजू झाले. सध्या ते हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांची श्रीनगर येथे पोस्टिंग झाली होती. येथील जवळपास सात हजार फूट उंचीवर असलेल्या अतिदुर्गम भागात देशसेवेच्या कर्तव्यावर होते. अतिरेकी देशाच्या सीमावर्ती भागात घुसखोरी करू नये यासाठी प्राणांची पर्वा न करता जवान अहोरात्र देशसेवा करीत असतात. सध्या श्रीनगर भागात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असून, मंगळवारी (ता.७) याठिकाणी कर्तव्य बजावत असताना आप्पा मते यांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला. या सुमारास मते यांचा हृदय विकाराच्या धक्क्याने वीरमरण आले.

पत्नी गरोदर असल्याची वार्ता मिळाल्याने ते खूश होते..

बुधवारी (ता.८) सकाळी ही वार्ता मते कुटुंबीयांना समजताच आडगाव गावावर शोककळा पसरली. मागील महिन्यात आप्पा मते पंधरा दिवस सुट्टीवर घरी आले होते. पत्नी गरोदर असल्याची आनंदाची वार्ता दोन दिवसांपूर्वी फोनवर सांगितली असल्याचे भाऊ भगीरथ यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, दहा वर्ष वयाचा मुलगा, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com