नाशिक-मुंबई प्रवास होणार आणखी जलद! मुंबईत पोचताना होणार दहा मिनिटांची बचत

विक्रांत मते
Wednesday, 14 October 2020

नाशिक ते मुंबई प्रवास करताना कल्याण फाट्यापासून ठाणेपर्यंत नाशिककरांना येणाऱ्या वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.पण आता नाशिक-मुंबई प्रवास सुखकर झाला असून, मुंबईत पोचताना दहा मिनिटांची बचत होणार आहे. ​

नाशिक : नाशिक ते मुंबई प्रवास करताना कल्याण फाट्यापासून ठाणेपर्यंत नाशिककरांना येणाऱ्या वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.पण आता नाशिक-मुंबई प्रवास सुखकर झाला असून, मुंबईत पोचताना दहा मिनिटांची बचत होणार आहे. 

मुंबईत पोचण्यासाठी नाशिककरांना पाऊण तास विलंब व्हायचा.
नाशिकहून मुंबईकडे महामार्गाने प्रवास करताना कल्याण फाट्यापर्यंतचा नाशिककरांचा प्रवास सुखकर होतो. वाहनधारकांची खरी कसरत पुढे सुरू होते ती कल्याण फाट्यापासून. कल्याण फाटा येथे भिवंडी, कल्याण, ठाणेसह नाशिककडून वाहने येत असल्याने या चौकात मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे कल्याण फाटा पार करताना अर्धा तास वाहने अडकून पडत होती. जानेवारीत उड्डाणपूल एका बाजूने खुला करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली. कल्याण फाटा पार केल्यानंतर माणकोली येथे वाहतूक कोंडी होत होती. तेथेही दहा ते पंधरा मिनिटे वाया जात असल्याने मुंबईत पोचण्यासाठी नाशिककरांना पाऊण तास विलंब व्हायचा.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

माणकोली पुलाचे काम पूर्ण; वाहतूक ठप्पमुळे विलंब 

परंतु गेल्या महिन्यात माणकोली-मोठागाव या सहापदरी उड्डाणपुलाची एक बाजू खुली करण्यात आल्याने वाहतूक ठप्प होण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. २०१६ पासून पुलाचे काम सुरू होते. २०१९ पर्यंत पूल हस्तांतरित करणे अपेक्षित असताना विलंब झाला. सप्टेंबरमध्ये पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने नाशिककरांचा मुंबईचा प्रवास सुखकर झाला आहे.  

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik-Mumbai journey will be faster nashik marathi news