महत्वाची बातमी : नाशिकमध्ये ७ दिवस १४४ कलम लागू....जमावबंदीचे आदेश

nashik holi.jpg
nashik holi.jpg
Updated on

नाशिक :  रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नाशिकमध्ये मंगळवार (ता.१०) पासून सात दिवस १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार असल्याची माहिती समजते. नाशिकमध्ये धुलिवंदन आणि १३ तारखेपर्यंत रहाड रंगपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या काळात नाशिक पोलीसांनी खबरदारी म्हणून हे कलम लागू करण्यात आले आहे. यासंबंधित परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. 

काय आहे १४४ कलम?

कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता १९७३ (sec.144 Cr.P.C. 1973)मधील असून ते अश्या ठिकाणी लागू केले जाते जिथे सुरक्षेसंबंधात भीती असेल वा दंगलीची संभावना असेल.तसेच यामध्ये ५ किंवा जास्त लोकांनी जमाव करण्याला आडकाठी आणते. यालाच जमावबंदी किंवा कर्फ्यू असेसुद्धा म्हणतात. जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी (collector) / जिल्हा दंडाधिकारी (district magistrate) / SDM (sub divisional magistrate) / इतर कार्यकारी दंडाधिकारी (any other executive magistrates) देऊ शकतात व लागू करू शकतात .

त्या दोघींना संशयित रुग्ण म्हणून दाखल

दुबई येथून परतलेल्या मुलीला आणि तीच्या आईला आज संशयित कोरोना रूग्ण म्हणून नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅप घेण्यात आले असून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नाशिकरोड येथील सदर १९ वर्षांची युवती काही दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आली होती. नाशिक महापालिकच्या बिटको रूग्णालयात या युवतीची आई परीचारीका असून तीला त्रास होऊ लागल्याने आज सकाळीच याच रूग्णालयातील डॉक्टरांना दाखवण्यात आले. यावेळी त्या महिलीची मुलगी दुबईहून आल्याचे कळाल्यानंतर महापालिकेने जिल्हा शासकिय रूग्णालयाल कळवले. जिल्हा रूग्णालयाच्या पथकाने बिटको रूग्णालयात येऊन या दोघी मायलेकींना दाखल केले. सदरची युवती दुबईतून आल्याने तीला दाखल करून घेतानाच तीच्या आईवरही उपचार सुरू करण्यात आले आहेत. दोघींचे स्वॅप घेऊन पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com