नाशिकचे पोलिस आता थुंकणाऱ्यांच्या शोधात! पैसे नसतील, तर आधारकार्ड चौकीत जमा करा! 

दत्ता जाधव
Monday, 12 October 2020

‘अरे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तुला दोनशे रुपये दंड भरावाच लागेल. पैसे नसतील, तर सोबतचे आधारकार्ड पोलिस चौकीत ठेवून जा व दोनशे रुपये दिल्यावर आधारकार्ड घेऊन जा’ असे प्रबोधन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. 

नाशिक / पंचवटी : ‘अरे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तुला दोनशे रुपये दंड भरावाच लागेल. पैसे नसतील, तर सोबतचे आधारकार्ड पोलिस चौकीत ठेवून जा व दोनशे रुपये दिल्यावर आधारकार्ड घेऊन जा’ असे प्रबोधन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. 

नाशिकचे पोलिस आता थुंकणाऱ्यांच्या शोधात 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना थुंकणारे शोधून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना असल्याने शहरात पोलिसांना थुंकणारे शोधण्याचे पोलिसिंग करावे लागत आहे. मास्क न लावता फिरणारे, भररस्त्यावर थुंकणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिस आयुक्तांनी अशा थुंकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पोलिसांना आता सराईतासोबत मास्क न लावता फिरणारे, तंबाखू खाऊन थुंकणारे शोधून दंडात्मक कारवाईची वेळ आली आहे. पंचवटीतील गजबजलेल्या चौकात व्यवसाय करणाऱ्या दोघांवर रस्त्यावर थुंकलेल्याना पोलिसांनी चौकीत आणले, परंतु त्याच्याकडे दंडासाठी दोनशे रुपये नव्हते, त्यामुळे त्यांचे आधारकार्ड चौकीत जमा करून घेत पोलिसांनी त्याला पैसे नंतर आणून दे, तोपर्यंत आधारकार्ड देऊन ठेव, असे सांगितले. 

हेही वाचा >  अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

कारवाई करणे काळाची गरज
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्वतःबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करणे काळाची गरज बनली आहे. - शंकरराव वालझाडे, व्यावसायिक  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik police action againts spitters marathi news