बागलाण तालुक्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने झोडपले; शेतीचे प्रचंड नुकसान 

प्रशांत बैरागी 
Thursday, 18 February 2021

 बागलाण तालुक्यात गुरुवारी ( ता. १८ )  सायंकाळी चार ते पाच  वाजेच्या सुमारास पिंगळवाडे, अंतापूर, ताहाराबाद परिसरात गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नामपूर (जि. नाशिक) :  बागलाण तालुक्यात गुरुवारी ( ता. १८ )  सायंकाळी चार ते पाच  वाजेच्या सुमारास पिंगळवाडे, अंतापूर, ताहाराबाद परिसरात गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसामुळे  उन्हाळ कांदा, द्राक्ष, डाळिंब,गहू आदिसह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपीटीची सर्वाधिक झळ ही उन्हाळ कांदा पिकाला बसली आहे.

उन्हाळ कांदा उध्वस्त
        
दुपारपर्यंत परिसरात कडक उन असल्याने पावसाचा कुणालाही अंदाज नव्हता. कडाक्याच्या उन्हाने असह्य उकाड़ा होत होता. सायंकाळी  अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन काळ्या ढंगानी गर्दी केल्याने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. परिसरात गारांचा पाऊस झाल्याने शेतीचे  कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मोसम खोऱ्यात उन्हाळ कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय

पाहणी करुण अहवाल सादर करण्याचे आदेश

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजल्याने मोठ्यां प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐनवेळी आलेल्या पावसाने शेतात साठवून ठेवलेला कांदा झाकन्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु होती. दाट लग्नतिथ असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. मोसम व करंजाडी खोऱ्यातील अनेक गावांना गारपीटीचा फटका बसला आहे. पावसामुळे  काहिकाळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दुष्काळी परिस्थितिमुळे यंदा शेती व्यवसायवर दुष्काळाचे सावट आहे. परंतु अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची  अवस्था झाली आहे. दरम्यान अवकाळी व गारपीट यामुळे  नुकसान झालेल्या भागांची कृषि व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुण अहवाल सादर करावा, असे आदेश बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिले आहेत. 

हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik rain updates Unseasonal rains along with hail in bagalan taluka