सिनेस्टाइल थरार! दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुंडांची पोलीसांनी चांगलीच जिरवली!

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 26 June 2020

जिल्ह्यातून तडीपार व विविध गंभीर गुन्ह्यांमधील फरारी, सद्यःस्थितीत धुळ्यात जेरबंद असलेल्या संशयिताने मनमाड येथे विक्री केलेल्या दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे धुळे शहर पोलिसांनी जप्त केली. ​

नाशिक : धुळे शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन दिवसांपूर्वी साक्री रोड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या नाशिक येथील दरोडेखोरांच्या टोळीला सिनेस्टाइल पाठलाग करून मुद्देमालासह ताब्यात घेतले. जिल्ह्यातून तडीपार व विविध गंभीर गुन्ह्यांमधील फरारी, सद्यःस्थितीत धुळ्यात जेरबंद असलेल्या संशयिताने मनमाड येथे विक्री केलेल्या दोन गावठी कट्ट्यांसह काडतुसे धुळे शहर पोलिसांनी जप्त केली. 

गावठी कट्टे व काडतुसांची विक्री
यातील प्रमुख जेरबंद दरोडेखोर विजय ऊर्फ छंगा सरजित बेंडवाल (वय 22 रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) नाशिक जिल्ह्यातून तडीपार असून, तो विविध गंभीर गुन्ह्यांमधील सराईत गुन्हेगार आहे. त्याने मनमाडला दोन गावठी कट्टे व काडतुसांची विक्री केल्याचे तपासात समोर आले. त्यावरून गुन्हे शोध पथकाने मनमाडला सापळा रचून पवन भाऊसाहेब देवकते (29, रा. बुधलवाडी, मनमाड), ललित रमेश मोतीयानी (21, मनमाड) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्यासाठी संशयित बेंडवालकडून गावठी कट्टे, काडतुसे खरेदी केल्याचे सांगितले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सकाळी हसतमुख दिसलेल्या लेकीची दुपारी डेडबॉडीच...आईने फोडला हंबरडा

पोलीसांनी केले गजाआड

पथकाने दोघांकडूनही सहा हजारांचे दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई धुळ्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष तिगोटे, शोध पथकाचे सहाय्यक उपनिरीक्षक नाना आखाडे, हिरालाल बैरागी, प्रकाश पाटील, हवालदार भिकाजी पाटील, सतीश कोठावदे, मुख्तार मन्सुरी, संदीप पाटील, योगेश चव्हाण, बापू वाघ, राजू वसावे, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, राहुल गिरी, विवेक साळुंखे, राहुल पाटील, तुषार मोरे, अविनाश कराड यांनी केली.

हेही वाचा > सावध व्हा...'हा' आजार पडेल महागात...कोरोनाचे व्हाल बळी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik robbers arrested in Dhule nashik marathi news