मुंबईनंतर नाशिकलाही भूकंपाचा धक्का; रिश्टर स्केलवर 3.2 नोंदली तीव्रता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

एकीकडे देशावर कोरोनासारख्या अदृश्य रोगाचे संकट असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज (ता.९) पहाटे नाशिकमध्ये 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. बुधवारी पहाटे 4.17 च्या सुमारास नाशिकमध्ये भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (NCS) म्हणण्यानुसार, आज पहाटे नाशिकच्या 93 किमी पश्चिमेस 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला.

नाशिक / सुरगाणा : एकीकडे देशावर कोरोनासारख्या अदृश्य रोगाचे संकट असताना गेल्या काही दिवसांपासून राज्यात भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज (ता.९) पहाटे नाशिकमध्ये 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. बुधवारी पहाटे 4.17 च्या सुमारास नाशिकमध्ये भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या (NCS) म्हणण्यानुसार, आज पहाटे नाशिकच्या 93 किमी पश्चिमेस 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला.

मोहपाडा-चिराई गावाला भूकंपाचे सौम्य धक्के 

सुरगाणा तालुक्याच्या घाटमाथ्यावरील मोहपाडा-चिराई गावाला मंगळवारी (ता. ८) पहाटे सव्वापाचला, सकाळी ७.३५ व अकराच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले होते. सरपंच नरेंद्र दळवी, पोलिसपाटील पोपट जाधव यांनी तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यावर तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी सकाळीच पावणेनऊच्या सुमारास गावात जाऊन पाहणी केली व ग्रामस्थांशी चर्चा करून, त्यांना घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले.

हेही वाचा > गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

 

हेही वाचा > धक्कादायक! कोरोनाबाधित मृतदेह नातेवाईकांना काढून नेण्यास सांगितले; वैद्यकीय अधीक्षकांनी मागविला खुलासा

घराच्या भिंतीला भेगा

दरम्यान, या भूकंपामुळे भाऊराव जाधव यांच्या घराच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पहिल्या धक्क्याची तीव्रता जास्त जाणवली. अनेकांच्या घरातील भांडी पडली व कौलारू छप्पर, लाकडी वाशांचा आवाज आला. नंतरचे दोन धक्के मात्र सौम्य स्वरूपाचे होते.  

संपादन - ज्योती देवरे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik was also hit by the earthquake marathi news