उत्तर प्रदेशमधील घटनेवरुन नाशिककर आक्रमक! गनिमी काव्याने योगींचा पुतळादहन; पाहा VIDEO

दत्ता जाधव
Monday, 5 October 2020

अत्याचार, खूनाबरोबरच पोलिसांच्या दडपशाहीचा शहर जिल्हा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. आज काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडत तीव्र निषेध केला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली होती, परंतु कायदा सुरव्यवस्था अबादित राखण्यासाठी पुतळादहनाला आक्षेप घेतला होता.

नाशिक : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरूणीवरील अत्याचार व हत्येप्रकरणी काँग्रेसने आज सोमवारी (ता. 5) आक्रमक पवित्रा घेत तेथील मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक दहन केले. आंदोलकांनी गनिमी काव्याने एका रिक्षातून योगीचा पुतळा आणून पोलिसांचा प्रयत्न हाणून पाडत पुतळा दहन केले. यावेळी योगी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 

उत्तरप्रदेशमधील घटनेवरून नाशिककर आक्रमक 

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील दलित तरूणीवरील अत्याचार व खूनप्रकरणी देशभर संतापाची लाट पसरली आहे. याघटनेची माहिती घेण्यासाठी काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरसकडे जात असताना पोलिसांनी बळाचा वापर राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली. अत्याचार, खूनाबरोबरच पोलिसांच्या दडपशाहीचा शहर जिल्हा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. आज काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडत तीव्र निषेध केला. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली होती, परंतु कायदा सुरव्यवस्था अबादित राखण्यासाठी पुतळादहनाला आक्षेप घेतला होता. मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दुपारी एकच्या सुमारास रिक्षातून पुतळा घेऊन येत गऩिमी काव्याने पुतळादहन करण्यात आले. 

योगी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला

यावेळी मुर्दाबाद मुर्दाबाद योगी सरकार मुर्दाबाद, मोदी, योगी सरकार हाय हाय, भाजप सरकारच्या दडपशाहीचा निषेध असो, नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेविका हेमलता पाटील, अनुसुचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर काळे, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वत्सला खैरे, बबलू खैरे, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, राजेंद्र बागूल, आशा तडवी यांच्यासह विविध सेलचे प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेही वाचा >  एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामागे उत्तर प्रदेश पोलिसांची दडपशाही हा मुख्य विषय असलातरी पक्षाचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांना देण्यात आलेली गैर वागणूक ख-या अर्थाने कारणीभूत ठरली. कारण पक्षाच्या माजी राष्टीय अध्यक्षांना एखाद्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी हिन वागणूक देणे उचित नव्हते, असा सूर शहराध्यक्षांनी लावला. या घटनेचे पडसाद आगामी निवडणुकांत उमटल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी बोलताना सांगितले. 

हेही वाचा >  गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

केद्र सरकारने पारित केलेल्या कृषी बिलाबाबत आंदोलन सुरूच आहे. आता उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील युवतीच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. - डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashikkar aggressive over incident in Uttar Pradesh nashik marathi news