
भन्नाट विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडा असल्याने या चित्रपटातदेखील काहीतरी हटके पाहायला मिळणार असल्याने रसिकांचे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्याची सोशल मीडियावर चांगलीच धूम सुरू आहे.
नाशिक : मालिका तसेच चित्रपटांमधून महाराष्ट्रातील घराघरांत पोचलेला नाशिककर असलेला अभिनेता चिन्मय उदगीरकर आता "सैराट' फेम रिंकू राजगुरू (आर्ची) सोबत चित्रपटात झळकणार आहे. "मेकअप' या मराठी चित्रपटात ही जोडी लग्न जमवताना होणाऱ्या गमतीजमती घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे.
लग्नासाठीच्या गमतीजमतीने प्रेक्षकांचे होणार मनोरंजन
चिन्मय उदगीरकर "मेकअप' या चित्रपटात पहिल्यांदाच डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. यानिमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर ही फ्रेश जोडी रसिकांना पाहायला मिळणार आहे. गणेश पंडित यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, लेखनही त्यांचेच आहे. भन्नाट विषय हाताळण्यात त्यांचा हातखंडा असल्याने या चित्रपटातदेखील काहीतरी हटके पाहायला मिळणार असल्याने रसिकांचे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्याची सोशल मीडियावर चांगलीच धूम सुरू आहे.
हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..
अगदी बिनधास्त... चुलबुली आणि शंभर टक्के मॅरेज मटेरियल असलेल्या "पूर्वी'ला (रिंकू राजगुरू) लग्नासाठी अनेक मुले बघण्यासाठी येत असतात. त्यांच्याकडून येणारा नकार पचवत ती अगदी बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगत असते. त्यामुळे त्यातील खरी पूर्वी कोण, मेकअपवाली पूर्वी कोण आणि पूर्वीचा हा मेकअप कशासाठी, स्वप्नातल्या राजकुमाराची वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात राजकुमार येणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या चित्रपटात चिन्मय आणि रिंकूसोबतच प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताह्मणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही दिसणार आहेत.
हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...