esakal | नाशिककर गारठले! पारा १५.९ अंशांवर; वातावरणातील गारवा पुन्‍हा वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

3thandi_20shekoti_3.jpg

यापूर्वी शुक्रवार (ता. २०) चे कमाल तापमान ३०.९ अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस इतके राहिले होते. वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागल्‍याने नागरिकांकडून बचावासाठी स्वेटर, मफलरसारख्या उबदार वस्‍तूंचा सहारा घेतला जातो आहे.

नाशिककर गारठले! पारा १५.९ अंशांवर; वातावरणातील गारवा पुन्‍हा वाढला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : काही दिवसांपूर्वी वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागल्‍यानंतर वातावरणात वाढ झाली होती. परंतु आता पुन्‍हा वातावरणात गारवा जाणवू लागला असून, शनिवारी (ता. २१) नाशिकचे किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस इतके राहिले. सायंकाळच्‍या वेळी गारव्‍यामुळे पुन्‍हा शेकोट्या पेटू लागल्‍या आहेत.

किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस

दिवाळीपूर्वी नाशिकचे किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. परंतु दीपोत्‍सवात तापमानात वाढ होऊन किमान तापमान वीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. उत्‍सव कालावधी संपल्‍यानंतर आता वातावरणात पुन्‍हा गारठा वाढू लागला आहे. शनिवारी किमान तापमान १५.९ अंश सेल्सिअस इतके राहिले. तर कमाल तापमान ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. यापूर्वी शुक्रवार (ता. २०) चे कमाल तापमान ३०.९ अंश सेल्सिअस होते. तर किमान तापमान १९.४ अंश सेल्सिअस इतके राहिले होते. वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागल्‍याने नागरिकांकडून बचावासाठी स्वेटर, मफलरसारख्या उबदार वस्‍तूंचा सहारा घेतला जातो आहे.

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?