मनसेच्या शक्तीप्रदर्शनाला नाशिकहून रसद! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

देशासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अवैध पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्यामागणीसाठी उद्या फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतगिरगाव येथील हिंदू जिमखान्यापासून तर आझाद मैदानापर्यत प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. आझाद मैदानावर मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होऊन तेथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

नाशिक : अवैध पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना भारताबाहेर हाकलण्याच्या मागणीसाठीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.9) मुंबईत निघणाऱ्या मोर्च्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातून दहा हजारावर कार्यकर्ते जाणार आहे. 

मुंबईतील मोर्च्याला नाशिकहून कार्यकर्ते जाणार 

देशासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या अवैध पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्यामागणीसाठी उद्या फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईतगिरगाव येथील हिंदू जिमखान्यापासून तर आझाद मैदानापर्यत प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. आझाद मैदानावर मोर्चाचे रुपांतर जाहीरसभेत होउन तेथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज्यातील विविध भागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सहभागी होणार असून नाशिकशहर आणि जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार मनसेचे सैनिक सहभागी होणार असल्याचा दावामनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

जोरदार तयारी

आठवड्यापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध मतदारसंघात नियोजन सुरु असलेल्या या आंदोलनाच्यातयारीसाठी तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वात वाहनांची व्यवस्था केली आहे. पक्षाचा नवीन झेंडा आणि वाहनावर स्टीकर लावण्याची जोरदार तयारी सुरु आहे. रविवारी (ता.९) सकाळी नाशिकहून वाहने रवाना होतील. कार्यकर्त्याच्या ताफ्यासोबत माजी महापौर अशोक मुर्तडक तीन रुग्णवाहीकांसह रवाना होणार आहे. घोटी टोल नाक्‍यावर वाहनांची नोंदणी होऊनचहापान, भोजनानंतर मुंबईला रवाना होतील. मुंबईहून परततांना वाशिंद येथील निसर्ग हॉटेलसमोरील मोकळ्या मैदानात कार्यकर्त्याच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. मनसेचे नेते डॉ. प्रदीप पवार, सरचिटणीस अशोक मुर्तडक जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, रतनकुमार इचम, नगरसेवक सलीम शेख, शहराध्यक्ष अंकुश पवार आदीच्या नेतृत्वाखालीपदाधिकारी कार्यकर्ते रवाना होणार आहे.  

हेही वाचा > मुलीचा विरह सहन होईना! व्याकूळ मातेचे अखेर टोकाचे पाऊल..

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik,s MNS activists supports MNS Mumbai,s Movement Political Marathi News