नाशिककरांसाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी! रुग्णांच्या मृ्त्यूदरात घट

विक्रांत मते
Friday, 25 September 2020

एप्रिल महिन्यात नाशिक शहरात कोरोना बाधित पहिला रुग्ण गोविंद नगर भागात आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. मे अखेर पासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. जुन, जुलै व ऑगष्ट या तीन महिन्यात दर महिन्याचा कोरोना बाधितांचा आकडा विक्रम मोडीत काढणारा ठरला.

नाशिक : शहरात मध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून पन्नास हजारांकडे कोरोना बाधितांचा आकडा पोहोचत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचले तर मृत्युच्या दरात शहरात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऑगष्ट महिन्यात पाच टक्के असलेला मृत्युचा दर सप्टेंबर अखेरीस १.४५ टक्क्यांपर्यंत खाली उतरला आहे तर राज्यात सध्या मृत्युचे प्रमाण २.०७ टक्के आहे. 

लवकरच कोरोना बाधितांचे अर्धशतक होणार

एप्रिल महिन्यात नाशिक शहरात कोरोना बाधित पहिला रुग्ण गोविंद नगर भागात आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. मे अखेर पासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. जुन, जुलै व ऑगष्ट या तीन महिन्यात दर महिन्याचा कोरोना बाधितांचा आकडा विक्रम मोडीत काढणारा ठरला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने हाहाकार उडविला. दररोज हजाराच्या पटीत रुग्णांची संख्या आढळून येवू लागली. सध्या ४७ हजारांपर्यंत कोरोना बाधितांची संख्या पोहोचली असून लवकरच कोरोना बाधितांचे अर्धशतक होणार आहे. शहरात आजमितीला ६६९ पर्यंत मृत्यु झाले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतं असला तरी बरे होण्याचे प्रमाण देखील समाधानकारक आहे. ४६, ८४३ रुग्णांपैकी ४२,६५० रुग्णांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले असून सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३,५१४ आहे. बरे होण्याचे प्रमाण हे ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

रुग्ण वाढले, मृत्युदर घटला 

शहरात आतापर्यंत दिड लाखांहून अधिक रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून आले परंतू त्या माध्यमातून तातडीने उपचार देखील करण्यात आल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. देशात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४४ दिवस, राज्याचा ४५ तर नाशिकचा २६ दिवस इतका आहे. नाशिक मधील कोरोना बाधितांच्या मृत्युचा दर देशाच्या सरासरी मृत्यू दरापेक्षा कमी आहे. राज्याचा मृत्यूदर २.०७ टक्के, देशाचा १.८९ तर नाशिक मध्ये १.४५ टक्के मृत्युदर सध्या आहे. 

हेही वाचा >  भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashiks mortality rate has come down nashik marathi news