वय वर्षे तीस...देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न.. पठ्ठ्या अखेर दहावी झालाच पास..!

गोपाळ शिंदे : सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 July 2020

अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे...अन् लष्करात भरती व्हायचं असा ध्यास मनाशी बाळगून वयाच्या तिसाव्या वर्षी 'ते' दहावी उत्तीर्ण झाले आहेत. परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी हे यश मिळविले आहे.

नाशिक : (घोटी) अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे...अन् लष्करात भरती व्हायचं असा ध्यास मनाशी बाळगून वयाच्या तिसाव्या वर्षी 'ते' दहावी उत्तीर्ण झाले आहेत. परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी हे यश मिळविले आहे.

लष्करात भरती होण्याची इच्छा

राष्ट्रीय धावपटू निलेश भास्कर बोराडे यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने त्यांना सातवीत शिक्षण सोडावे लागले. मातीखाण काम करून दररोज 30 किलोमीटर मुंबई - नाशिक महामार्गावर अनेकांवेळा धावतांना कसरत करत असे. तब्बल चौदा वर्षांनी दहावीत 65 टक्के गुण मिळवत यश संपादन केले. देशाच्या अनेक मॅरेथॉनमध्ये सहभागी होत काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत धावणारी आंतरराष्ट्रीय धावपट्टू सुपी सुपिया हिच्याबरोबर धुळे ते कसारा 230 किलोमीटर अंतरावर साथ दिली. जम्मू काश्मीर, दार्जिलिंग, गुहाटी, कारगिल यांसह देशाच्या विविध राज्यात मॅरेथॉनमध्ये निलेशने भाग घेत देशाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख निर्माण केली. देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याने निलेश  याचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत. 

हेही वाचा > संपूर्ण गाव हादरले! विहीरीत तरंगणारी 'ती' गोष्ट पाहिली.. खुलासा होताच कुटुंबियांचा आक्रोश

पाचशे किलोमीटर धावण्याचा विक्रम

निलेश यांनी विविध स्पर्धेच्या माध्यमातून आत्तापर्यंत बारा हजार पाचशे किलोमीटर धावण्याचा विक्रम केला आहे. यातून अनेक गोल्ड मेडल देखील मिळवले आहे. त्यांना देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अशी त्याने सकाळ'शी बोलतांना माहिती दिली.  

हेही वाचा > एक होती तान्हुल्याच्या काळजीपोटी गड उतरणारी हिरकणी..अन् एक 'ही'..! घराघरात चर्चा..

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National sprinter Nilesh Borade passed 10th in his thirty age nashik marathi news